Hemant Dhome Targets Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी वादग्रस्त वक्तव्य करून शीवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. अशातच आता राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण सोलापूरकरांनी दिलं आहे. अशातच आता याप्रकरणी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेनं आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यासंदर्भात हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) एक ट्वीट केलं आहे. 


अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे ट्वीट करत म्हणाला की, "इतिहासाला त्याच्या जागी राहू द्या! आम्हाला आमच्या महाराजांच्या रंजक गोष्टींमध्ये रमू द्या! रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात! असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधून पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेलेच बरे! उगाच सगळे सोलापूरकर बदनाम होतात! जय शिवराय!..." 




राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणालेले? 


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगावर भाष्य करत एक नवा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेला.  त्यानंतर सर्वच स्तरांतून संतापाची लाट उसळली होती. अनेकांनी राहुल सोलापूरकरांवर टीकास्त्र डागलेलं. 


अभिनेते सोलापूरकर म्हणालेले की, "महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा पेटारे बिटारे काही नव्हते.‌ चकलाच देऊन ते आले आहेत. त्यासाठी किती हुंडा वठवला त्याचेही पुरावे आहेत.‌ अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाज दिली होती. मोहसीन खान ही मोईन खान असं नाव आहे त्याच्याकडूनच अधिकृत शिक्के परवाने घेऊन ते सगळे बाहेर पडलेले. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटी निघाले. त्यांच्या परवानाची खून सुद्धा उपलब्ध आहे. गोष्टी रुपात करताना मग ते सगळं लोकांना जरा रंजक करून सांगावं लागतं. रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो किंवा बाजूला टाकला जातो मग खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलाच जात नाही... महाराजांच्या शिस्तीचे मोठेपण म्हणून रचलेली कथा म्हणजे गडाचे दरवाजे सूर्यास्त नंतर बंद व्हायचे. याच्यातून निर्माण झालेली हिरकणी ही कथा. हिरकणी घडलेलीच नाही. मी रायगडावर फिल्म केली आहे पण तिथे हिरकणी असं काही नाही. असा इतिहास नाही पण ते लिहिले गेले आहे. रंजकतेच्या नावाखाली खरा इतिहास आणि खरे शिवाजी समजत नाही..."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


25 किलो वजन वाढवलं, 7 महिने कठोर मेहनत; छत्रपती संभाजी महाराज साकारण्यासाठी विक्की कौशलनं काय-काय केलं?