Trigrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारीचा (February) महिना ज्योतिषीय दृष्टीकोनातून फार महत्त्वाचा असणार आहे. ताकण या महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य (Sun) कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे एका वर्षानंतर सूर्य-शनीची युती होणार आहे. त्याचबरोबर, कुंभ राशीत सूर्य, बुध आणि शनीच्या युतीने त्रिग्रह योग निर्माण होणार आहे. या दुर्लभ योगाचा अनेक राशींवर परिणाम होणार आहे. काही राशींना प्रमोशन मिळू शकतं. तर, काही राशींना धनलाभ मिळू शकतो. त्यामुळे हा त्रिग्रह योग कोणत्या 5 राशींसाठी (Zodiac Signs) शुभ ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा महिना फार खास असणार आहे. नोकरदार वर्गातील लोक अनेक दिवसांपासून प्रमोशनच्या प्रतीक्षेत होते त्यांना चांगलं प्रमोशन मिळेल. तसेच, महिन्याच्या मध्यात कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या. कुटुंबात शुभ कार्य पार पडेल. तसेच, संपत्तीशी संबंधित ज्या काही समस्या होत्या त्या लवकरच संपुष्टात येतील. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना फार महत्त्वाचा असणार आहे. या राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांची महिन्याची सुरुवात चांगली असेल. तुमच्या व्यवसायाचा मोठा विस्तार होईल. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हानं समोर येतील. मात्र, या आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना फार शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमची चांगली प्रगती होईल. करिअरच्या बाबतीत तुम्ही नवीन योजनांचा वापर करु शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ पाहायला मिळेल. या काळात मेहनतीने काम करणं गरजेचं आहे. नशिबावर अवलंबून चालणार नाही. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्यातील ग्रहांची स्थिती फार शुभ असणार आहे. या दरम्यान तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तुमच्या व्यवसायात मात्र तुम्हाला जपून निर्णय घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


February Month Lucky Zodiacs : फेब्रुवारी महिना 'या' 4 राशींसाठी ठरणार लकी; चुंबकासारखा पैसा हातात खेळणार, आरोग्यही राहील ठणठणीत