Vir Das: अभिनेता आणि कॉमेडियन वीर दासने   (comedian and actor Vir Das) अमेरिकेत  वॉशिंग्टन डीसीमध्ये स्टँड अप कॉमेडी शो दरम्यान एक कविता सादर केली. या कवितेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कवितेमध्ये वीर दासने भारताबद्दल अपमानास्पद गोष्टी म्हणल्या आहेत, असं अनेकांचे मतं आहे. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी  ट्रोल केले असून मुंबई हायकोर्टाचे वकिल आशुतोष जे दुबे यांनी वीर दासच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. 


अशोक पंडित यांचे ट्वीट


 प्रसिद्ध चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी वीर दासला आतंकवादी म्हणतं ट्वीट केले आहे. अशोक पंडित  यांनी ट्वीटमध्ये लिहीले,' मला हा माणूस आतंकवादी वाटतो. तो त्या स्लीपर सेलच्या सदस्यांपैकी एक आहे,  ज्यांनी परदेशात आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारले. ' तसेच अशोक पंडित यांनी यूएपीए अंतर्गत वीर दासला अटक करण्याची मागणी केली आहे.







Rajkummar Rao Net Worth: 'राजकुमार' जगतोय राजाप्रमाणे आयुष्य; एका चित्रपटासाठी घेतोय कोट्यवधींचं मानधन


प्रीति गांधी यांनी वीर दासच्या कवितेचा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहीले, 'वीर दास तुम्ही अशा भारताचे आहात. जिथे तुम्ही आपल्याच देशाचा अपमान करून जीवन जगत आहात. तुम्ही अशा देशाचे आहात जो देश तुम्हाला अशी घृणास्पद विधाने, अपमानास्पद गोष्टी करण्याची परवानगी देतो.'






Kangana Ranaut : 'दुसरा गाल पुढे केल्यानं भिक मिळते स्वातंत्र्य नाही'; कंगनाचं पुन्हा बरळली