Bigg Boss Marathi Season 5:  बिग बॉस मराठीची नेहमीच चर्चा रंगते. या खेळाचे प्रत्येक पर्व चांगलेच गाजते. बिग बॉस मराठीचा पाचवा सिझनही तेवढाच चर्चेत आला. या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण तर चांगलाच प्रसिद्ध झाला. दरम्यान, कलर्स मराठीने आता नवी घोषणा केली आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून रितेश देशमुखसोबत बिग बॉस मराठीची धम्माल पाहता येणार आहे. 

कलर्स मराठीने आता महत्त्वाची घोषणा केली आहे. आता फेब्रुवारी महिन्यातच पुन्हा एकदा बिग बॉस मराठी दाखवला जाणार आहे. कलर्स मराठीने याबाबत अधिकृतपणे घोषणा केली आहे.  कलर्स मराठीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेचे अनेक अर्थ काढले जात आहेत. कारण या घोषणेतून बिग बॉस मराठीचा नवा सिझन येणार, की जुनाच सिझन पुन्हा एकदा दाखवला जाणार? हे स्पष्ट होत नाहीये. त्यामुळेच कलर्स मराठीच्या या घोषणेचा नेमका अर्थ काय? असे विचारले जात आहे. 

कलर्स मराठीने नेमकी काय घोषणा केली? 

कलर्स मराठीने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रितेश देशमुख दिसतेय. सोबतच या व्हिडीओला एक कॅप्शन देण्यात आले आहे. "कलर्स मराठी घेऊन येत आहे मनोरंजनाचा तडका. पुन्हा एकदा रितेश देशमुखसोबत होणार बिग बॉस मराठीचा खास धमाका! पहा, 10 फेब्रुवारीपासून 'Bigg Boss मराठी', दररोज दुपारी 3 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जिओ सिनेमावर" असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलंय. म्हणूनच यावेळी कलर्स मराठीवर बिग बॉसचे नवे सिझन दाखवले जाणार की जुन्याच सिझनचे पुन:प्रक्षेपण होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  

दरम्यान, कलर्स मराठीच्या या पोस्टनंतर बिग बॉस मराठीचा जुनाच म्हणजेच पाचवा सिझन दाखवला जाणार असल्याचे मत काहीजण व्यक्त करत आहेत.  

हेही वाचा :

उदित नारायण यांचा महिलांना किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल, आता लेकाच्याही जुन्या कारनाम्याची चर्चा; मुलीने मारली होती कानाखाली!

चित्रपटाआधी दिग्दर्शकाच्या 'त्या' मागणीमुळे प्रियांका चोप्राला आला होता भयंकर राग, 19 व्या वर्षीच उचललं होतं मोठं पाऊल! 

400000000 रुपयांचा मालक आहे क्रिकेटर पती , तर भाऊ कॉमेडीयन; प्रसिद्ध अभिनेत्याची भाची, कोण आहे 'ही' अप्सरा?