मुंबई : पार्श्वगायक उदित नारायण (Udit Narayan) सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी एका गायनाच्या कार्यक्रमात महिला चाहत्यांना लाईव्ह किस केलंय. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर त्यांनी चार महिलांना किस केल्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय. या प्रसंगाचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, उदित नारायण यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता त्यांच्या मुलाचीही म्हणजेच आदित्य नारायणचाही एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. त्याला एका मुलीने थेट कानशिलात लगावली होती. 

गर्लफ्रेंडसोबत गेला होता पबमध्ये  

उदित नारायण एकीकडे वादात सापडलेले असताना आता त्यांच्या मुलाचीही वेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. आदित्य अनेकदा त्याच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेचं कारण ठरलेलं आहे. त्याला एकदा एका मुलीने थेट कानाखाली मारली होती. हा प्रसंग 2011 सालचा आहे. तेव्हा आदित्य त्याच्या श्वेता नावाच्या गर्लफ्रेंडोबत होता. आता त्याने याच श्वेताशी लग्न केलेलं आहे. त्यावेळी आदित्य नारायणसोबत त्याचे इतरही काही मित्र होते. तेव्हा अनेक माध्यमांनी आदित्य नारायणने मद्य प्राशन केले होते, असा दावा केला होता. त्यानंतर त्याला एका मुलीने कानाखाली मारली होती, असं म्हटलं जातं. 

मुलीच्या अंगावर पडला होता

त्यावेळी नशेत असताना आदित्य नारायणने एका मुलीवर कमेंट केली होती. तेवढंच नाही तर तो त्या मुलीच्या अंगावरही पडला होता. याच कारणामुळे रागात येऊन त्या मुलीने आदित्यच्या कानशि‍लात लगावली होती. ही घटना समोर आल्यानंतर मात्र असं काहीही झालेलं नाही, असा दावा आदित्यने केला होता. माझा त्या मुलीसोबत फक्त वाद झाला होता, असं आदित्यने म्हटलं होतं. 

उदित नारायण नेमकं का चर्चेत आले आहेत? 

सध्या उदित नारायण यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते 'टीप टीप बरसा पाणी' हे हिंदी भाषेतील गाणे गाताना दिसत आहेत. यावेळी काही महिला त्यांच्याकडे फोटो काढण्यासाठी येत असल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे फोटो काढताना उदित नारायण यावेळी महिलांना किस करत असल्याचं दिसतंय. एक-दोन नव्हे तर तब्बल चार महिलांनी त्यांनी किस केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय. यावरच अनेकांनी आक्षेप घेतला आहे. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उदित नारायण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. चाहते वेडे असतात. ते काहीही करतात. काही लोक या प्रसंगाची मदत घेऊन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी फार साधा माणूस आहे, असं उदित नारायण म्हणाले आहेत. 

हेही वाचा :

VIDEO : जेव्हा उदित नारायण यांनी स्टेजवरच श्रेया घोषाल अन् अलका याज्ञिक यांनाही केलं होतं KISS...; जुना व्हिडीओ व्हायरल