Priyanka Chopra : कधीकाली बॉलिवुडमध्ये काम करणारी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आज जगभरात ओळखली जात आहे. आज ती हॉलिवुडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दरम्यान, करिअरच्या सुरुवातीला तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. चित्रपट मिळवण्यासाठी तिने अनेक संकटं पार केले होते. मात्र एक चित्रपट करण्याआधी दिग्दर्शकाच्या आगळ्यावेगळ्या मागणीमुळे ती चांगलीच हैराण झाली होती. दिग्दर्शकाच्या या मागणीनंतर तिने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा तेव्हा अवघ्या 19 वर्षांची होती.
दिग्दर्शकाने प्रियांकाकडे केली होती मागणी
प्रियांका चोप्राला फोर्ब्स पॉवर वुमन्स परिषदेत आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना तिने या प्रसंगाबाबत सविस्तर सांगितले होते. प्रियांका चोप्राने सांगितल्यानुसार तेव्हा ती 19 वर्षांची होती. तय्या काळात चित्रपट मिळवण्यासाठी ती शर्थीचे प्रयत्न करत होती. तिला योगायोगाने एक चित्रपट मिळालाही होता. तेव्हा तिने चित्रपट निर्मात्यांकशी संपर्क साधून चित्रपटात तिला मिळालेली भूमिका आणि त्या भूमिकेला साजेसे असणारे कपडे कसे असावेत? याबाबत विचारले होते. त्यानंतर त्या दिग्दर्शकाने प्रियांका चोप्राकडे अजब अशी मागणी केली होती. "त्या दिग्दर्शकाने फोन उचलून मला सांगण्यास सुरुवात केली. जेव्हा एखादी अभिनेत्री आपली अंतर्वस्त्र दाखवते तेव्हाच लोक चित्रपट पाहतात. अशा प्रकारची लोक अभिनेत्रीची अंतर्वस्त्र दिसावीत यासाठी चित्रपट पाहण्यासाठी समोरच बसतात. त्यामुळे अंतर्वस्त्र दाखवणं या चित्रपटात फारच गरजेचं आहे असं त्याने माल सांगितलं होतं," अशी माहिती प्रियांका चोप्राने दिली होती.
दिग्दर्शकासोबत अजूनही काम केलेलं नाही
थोडक्यात दिग्दर्शकाने प्रियांका चोप्राला चित्रपटात तिची अंतर्वस्त्रं दाखवायला सांगितले होते. प्रियांकाला हा सर्व प्रकार समजला. त्यानंतर ती थेट घरी निघून आली. हा सर्व प्रसंग तिने तिच्या आईलाही (मधू चोप्रा) सांगितला होता. सोबतच मी भविष्यात कधीच त्या दिग्दर्शकासोबत काम करणार नाही, असेही ठरवून टाकले होते. तेव्हापासून आतापर्यंत प्रियांका चोप्राने त्या दिग्दर्शकासोबत काम केलेलं नाही. विशेष म्हणजे प्रियांकाने तो चित्रपटही सोडून दिला होता.
अनेक दर्जेदार चित्रपटांत केलंय काम
दरम्यान, प्रियांका चोप्राने बॉलिवुडमधील करिअरला 2003 सालापासून सुरुवात केली. द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाय (2003) हा प्रियांका चोप्राचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात सनी देओल आणि प्रीति झिंटा मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर प्रियांकाने ‘अंदाज’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘डॉन’, ‘फॅशन’ ‘डॉन 2’, ‘मेरी कॉम’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘बिग ब्रदर’, ‘राम-लीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘अग्निपथ’, ‘बर्फी’, ‘दोस्ताना’, ‘द स्काय इज पिंक’ यासारखे अनेक दर्जेदार चित्रपट केले. तिने 2017 साली बे वॉच या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते.
हेही वाचा :