Pushpa 2 Lifetime Collection Worldwide: अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर फिल्म 'पुष्पा 2'नं (Pushpa 2) अजूनही बॉक्स ऑफिस (Box Office) सोडलेलं नाही. 'पुष्पा 2' (Pushpa 2 The Rule) 5 डिसेंबरला वर्ल्डवाईल्ड रिलीज करण्यात आली होती. फिल्मला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं आणि ही फिल्म बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) ब्लॉकबस्टर ठरली. आता रिलीजच्या 75 दिवसांनी मेकर्सनी 'पुष्पा 2'च्या लाईफटाईम कलेक्शनबाबत (Lifetime Collection) माहिती दिली आहे. मेकर्सनी एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. 

Continues below advertisement

'पुष्पा 2'नं वर्ल्डवाईल्ड बॉक्स ऑफिसवर शानदार कलेक्शन केलं आणि भारताची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली. 1871 कोटी रुपयांच्या लाईफटाईम कलेक्शनसोबत 'पुष्पा 2'नं बाहुबली 2 च्या (1788.06 कोटी) वर्ल्डवाईल्ड कलेक्शनला मात दिली आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनची फिल्मनं आमिर खानच्या दंगलला (2122.3 कोटी) देखील मात दिली आहे. 

जगभरात 1871 कोटींची कमाई 

'पुष्पा 2'मधील अल्लू अर्जुनच्या लूकचं पोस्टर शेअर करताना फिल्मचं प्रोडक्शन हाऊस माइथ्री मूव्ही मेकर्सनी लिहिलं आहे की, "अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढून आणि नवे रेकॉर्ड बनवत, 'पुष्पा 2: द रूल' भारतीय सिनेमाची हिट फिल्म ठरली आहे. 'पुष्पा 2: द रूल'नं जगभरात 1871 कोटींची कमाई केली आहे. रिकॉर्ड्स रैपा रैपा..."

Continues below advertisement

OTT वर 'पुष्पा 2'चा जलवा 

अल्लू अर्जुनची फिल्म 'पुष्पा 2: द रूल'नं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. त्यासोबतच फिल्म ओटीटीवर रिलीज करण्यात आली आहे. फिल्म 30 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली होती. सर्वात आधी फिल्मला तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्येच ओटीटीवर रिलीज केलं जाणार होतं. पण, चाहत्यांच्या आग्रहाखातर फिल्मचं हिंदी वर्जन रिलीज करण्यात आलं. सध्या ओटीटीवर 'पुष्पा 2: द रूल'चीच हवा आहे. 

दरम्यान, 'पुष्पा 2: द रूल' 2024 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झालेल्या चित्रपटानं बरेच दिवस बॉक्स ऑफिस स्वतःच्याच ताब्यात ठेवलं होतं. यादरम्यान अनेक चित्रपट आले अन् गेलं, पण 'पुष्पा 2: द रूल'ला मात कोणीच देऊ शकलं नाही. 'पुष्पा 2: द रूल'मध्ये मुख्य भूमिकेत साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना दिसून आले. 'पुष्पा 2'नं भल्या भल्या दिग्गजांच्या चित्रपटांनाही मागे टाकलं. एवढंच नाहीतर 'पुष्पा 2'नं अनेक चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शन एवढी कमाई फक्त आणि फक्त एका दिवसांत केलीय. पुष्पाभाऊनं भारतीय सिनेसृष्टीत विक्रमांचे डोंगरच्या डोंगर रचलेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :  

Chhaava Movie Dialogue: "...मौत के घुंघुरु पहनकर नाचते हैं हम औरंग"; छत्रपती शंभू राजांनी औरंगजेबाला ललकारलं अन् सर्रकन अंगावर काटा आला