मुंबई : अभिनेता चंकी पांडे (Chunky Panday)  यांची आई स्नेहलता पाडे (Snehlata Panday)  यांचे आज मुंबईत निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वार घेतला आहे.  पांडे कुटुंबियांच्या जवळच्या नातेवाईकांनी चंकी पांडेची आई आणि अनन्या पांडेची (Ananya Panday) आजीचे निधन झाल्याची माहिची दिली. एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, शनिवारी दुपारी 12 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने खार येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. 


स्नेहलता पांडे यांना ज्यावेळी हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी त्यांची दोन मुले चंकी पांडे, चिक्की पांडे आणि नातू अहान पांडे घरात उपस्थित होते. निधनाची बातमी समजताच चंकी पांडे आणि भावना पांडेची जवळची मैत्रिण अभिनेत्री निलम कोठारी, अभिनेता समीर सोनी, कॉंग्रेस नेते भाई जगताप, बाबा सिद्दकी अंतिम दर्शनासाठी पोहचले.


आजीच्या निधनाची बातमी कळताच अनन्या पांडे आपले शूटिंग पूर्ण करून अंतिम दर्शनासाठी गेली. अनन्या मुंबईत एका टॉक शोच्या चित्रीकरणात व्यस्त होती. संध्याकाळी 5.20 ला सांताक्रुज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या निधनानंतर शनिवारी चंकी पांडे यांच्यासह कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 






अभिनेत्री अनन्या आपली आजी स्नेहलता पांडेची लाडकी होती. अनन्या 2019 साली आपल्या आजीच्या 83 व्या वाढदिशी एक खास पोस्ट लिहिली होती. या पोस्टबरोबर अनन्याने एक डान्स व्हिडीओ देखील शेअर केला होता ज्यामध्ये अनन्याची आजी 'ये जवानी है दिवानी' या गाण्यावर डान्स करताना दिसली. तसेच या वर्षी महिला दिनाच्या दिवशी देखील अनन्याने आजीसोबता फोटो शेअर करत आजीचं आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगितले होते.