Comments on Chinmay Mandlekar Viral Video : मुलाच्या नावावरुन ट्रोलिंग केल्यानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chimay Mandlekar) याने एक मोठा निर्णय घेतला. महाराजांची भूमिका केल्यामुळे जहांगीर या नावावरुन ट्रोलिंग केलं. त्यानंतर चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोशल मीडियावर चिन्मयच्या समर्थनार्थ अनेकांनी कमेंट्स करत त्याला हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. 


चिन्मयने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने तो सध्या बराच ट्रोल होतोय. या सगळ्याचा त्याच्या कुटुंबाला त्रास होत असल्याने चिन्मय पण यावर चिन्मयच्या बायकोने म्हणजेच नेहा जोशी मांडलेकर हीने एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता.चिन्मयच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना देखील बराच धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. 


चिन्मयच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस


चिन्मयला ट्रोल केल्यानंतर अनेकांनी त्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर कमेंट करत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तसेच त्याला त्याचा हा निर्णय मागे घेण्याची देखील विनंती केली आहे. एकाने म्हटलं की,'कुठं बिनडोक लोकांच्या नादी लागताय दादा', दुसऱ्याने 'दादा अवघ्या महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो ही भूमिका सोडू नकोस. इतकी चोख भूमिका तूच पार पाडू शकतोस, सोबतच महाराजांचा आब आणि रुबाब पण तूच राखू शकतोस. दुसरेही राखतील यात शंका नाही पण तुझी गोष्ट निराळी.. म्हणूनच दादा छत्रपती शिवरायांची भूमिका आहे तशीच चालू ठेव. पुढच्या पिढीलाही तुलाच महाराजांच्या भूमिकेत दाखवायला आम्हाला आवडेल दादा. घेतलेल्या निर्णयाबद्दल अजून तू विचार करावा हीच इच्छा.' 


आणखी एका व्यक्तीने कमेंट करत म्हटलं की, 'चिन्मय जी, तुम्ही जर हे ट्रोलिंग वाचून छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका केली नाही तर हे ट्रोलर जिंकले असा त्याचा अर्थ होतो. या सध्याच्या मुर्खांच्या बोलण्यावरुन आपलं काम बदलू नये. या ट्रोलर ना ब्लॉक करणं तुमच्या हातात आहे. त्याचा वापर करा. आणि ट्रोलर्स ची तोंडं बंद करा. महाराजांची भुमिका न करणं हा यावर चा उपाय नाही. तरी याचा विचार करावा ही नम्र विनंती'


पण चिन्मयच्या या व्हिडिओवर अनेकांनी नकारात्मक कमेंट्सही केल्या आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावरचं वातावरण चांगलच तापलं असल्याचं चित्र आहे. यावर आता चिन्मय त्याचा निर्णय मागे घेणार की तो त्याच्या निर्णयावर ठाम राहणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. 


ही बातमी वाचा :


Chinmay Mandlekar : 'जहांगीर'च्या ट्रोलिंगनंतर कलाकारांनीही व्यक्त केला संताप, निर्णय मागे घेण्याचीही केली विनंती; चिन्मयसाठी सिनेसृष्टी एकवटली