Chinmay Mandlekar:  मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण बुधवारी (दि. 24 एप्रिल) करण्यात आले. यंदाच्या वर्षी पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ए.आर. रहमान (A. R. Rahman), अशोक सराफ (Ashok Saraf), अतुल परचुरे (Atul Parchure), चिन्मय मांडलेकर आदींचा समावेश होता. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सन्मानार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. चिन्मय मांडलेकर यलाही 'गालिब' या नाटकासाठी मोहन वाघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अभिनेता-लेखक  चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) आपल्या भावना व्यक्त केल्या. चिन्मय मांडलेकरने आपल्या अवघ्या काही मिनिटांच्या भाषणात उपस्थितांची मने जिंकली. 


मराठी माणसाच्या डीएनएमध्ये तीन नावे...


चिन्मय मांडेलकरने पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात चिन्यय मांडलेकरने म्हटले की, भारतात जन्माला आलेल्या लोकांच्या मनात काहीजणांचे आदराचे स्थान असते. नकळतपणे या गोष्टी डीएनएमध्ये असतात. मी महाराष्ट्राचा आहे,  त्यामुळे मराठी माणसाच्या डीएनएमध्ये तीन नाव नक्कीच असतात. यामध्ये एक आहेत मंगेशकर, दुसरे आहेत बच्चन आणि तिसरे आहेत सराफ. चिन्मय मांडलेकरच्या वक्तव्यावर सभागृहात 
टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला. 


चिन्मयने पुढे म्हटले की, 'शिवकल्याण राजा' हे अगदी न कळत्या वयापासून कानावर ऐकू येत होते. माझ्या कळण्याच्या वयात पहिला चित्रपट पाहिला तो नमक हराम होता आणि 'अशी ही बनवाबनवी' तर 100 वेळा पाहिला आहे. यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. त्यामुळे आम्ही या क्षेत्रात कसे तर याचे उत्तर यामध्ये असल्याचे चिन्मय मांडलेकरने सांगितले. 


 


यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची यादी :


मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आतापर्यंत सुमारे 212 व्यक्तींना गेल्या 34 वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. 


उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्कार - चिन्मय मांडलेकर


मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार - अशोक सराफ


मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार - पद्मिनी कोल्हापूर


मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ संगीत सेवा पुरस्कार - रुपकुमार राठोड


मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार - भाऊ तोरसेकर


मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार - अतुल परचुरे


मास्टर दिनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार - रणदीप हुडा