All We Imagine as Light :   छाया कदम (Chhaya Kadam) यांनी 2024 वर्षात विविध भूमिका साकारल्या आणि त्या जागतिक स्तरावर जाऊन पोहचल्या.  नुकताच त्यांचा ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' () ला 82 व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे.  महत्त्वाची बाब अशी 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' एकूण दोन नामांकने मिळाली असून दुसरी एक सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर - (इंग्रजी नसलेली भाषा) साठी आहे. विशेष म्हणजे या श्रेणीमध्ये भारतीय दिग्दर्शकाचे नामांकन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना छाया कदम यांनी म्हटलं की, भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर पोहोचतोय, याचा आनंद वाटतो. 


छाया कदम यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट'चा प्रीमियर 23 मे रोजी 2024 कान्स चित्रपट महोत्सवात झाला होता. आता हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधी अनेक पुरस्कार पटकावले आहेत आणि आता वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळवण्याचा बहुमान देखील पटकावला आहे.


आंतरराष्ट्रीय पुरस्कराने सन्मान


काही दिवसापूर्वी ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट’ या चित्रपटाला न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलमध्ये (NYFCC) सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे आणि आता हा चित्रपट पुन्हा एक नवा पुरस्कार जिंकण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. 


छाया कदम यांनी काय म्हटलं?


याविषयी बोलतान छाया कदम यांनी म्हटलं की, "ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’साठी मिळालेलं गोल्डन ग्लोब नामांकन हे माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर पोहोचतोय, याचा आनंद वाटतो. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जवळ आहे. तो मानवी भावना, संघर्ष आणि प्रकाशाच्या शोधाबद्दल आहे. माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झालं. या नामांकनाने आम्हाला पुढे आणखी उत्तम कथा सांगण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. प्रेक्षकांनी दाखवलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी मनःपूर्वक आभारी आहे." 


ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट’मध्ये छाया कदम, कानू कुसरुती, दिव्या प्रभा आणि यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट फ्रान्समधील ‘पेटीट काओस’ आणि भारतातील ‘चॉक अँड चीज’ आणि ‘अनदर बर्थ’ यांची अधिकृत इंडो-फ्रेंच सहनिर्मिती आहे.


ही बातमी वाचा : 


Aaliyah Kashyap Wedding Pics: नवरदेवाच्या डोळ्यात पाणी, लिपलॉकने वेधलं लक्ष; अनुराग कश्यपची लेक आलिया अडकली लग्नबंधनात