Chhaava Movie Viral Deleted Scene: 'छावा' सिनेमा (Chhaava Movie) रिलीज झाला आणि महाराष्ट्राच्या धाकल्या धन्याचं शौर्य अवघ्या भारतानं रुपेरी पडद्यावर पाहिलं. छत्रपती शंभू राजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमाची, शौर्याची अनुभूती अख्ख्या जगानं अनुभवली. आजही 2025 मधली सर्वाधिक कमाई करण्याचा बहुमान 'छावा'च्याच (Chhaava) नावावर आहे. 'छावा'नं संपूर्ण भारत भरात धमाकेदार कमाई केली. कित्येक आठवडे बॉक्स ऑफिसवर (Box Office) 'छावा'नं ताबा ठेवला होता. काही दिवसांपूर्वीच ब्लॉकबस्टर सिनेमा टीव्हीवर दाखवण्यात आला. त्यावेळी काही डिलीट केलेले सीन्स टीव्हीवर दाखवण्यात आले. सध्या 'छावा'मधल्या डिलीट केलेल्या सीन्सची जोरदार चर्चा सुरू आहे.    


'छावा' थिएटरमध्ये पाहताना डिलीट केलेल्या सीन्सबाबत एवढं काही जाणवलं नाही. पण, त्यावेळी सिनेमातून काही सीन्स वगळण्यात आले होते. सिनेमा पाहताना मात्र जाणवलं नाही पण आता 'छावा' सिनेमा काही दिवसांपूर्वी टीव्हीवर दाखवण्यात आला. तेव्हा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा' सिनेमातील डिलीट केलेले काही सीन्स टीव्हीवर दाखवले. त्यामुळे प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या. याशिवाय सर्वांना मनोरंजनाची पर्वणी मिळाली. 'छावा' सिनेमातील असाच एक डिलीट झालेला सीन समोर आला आहे. या सीनमध्ये शंभूराजे औरंगजेबाला सडेतोड उत्तर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. 






डिलीट सीनमध्ये काय दाखवलंय? 


'छावा' सिनेमातला डिलीट केलेला एक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विक्की कौशलच्या एका फॅन पेजनं हा सीन सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेव एकमेकांसमोर उभे आहेत. या सीनमध्ये स्पष्ट दिसतंय की, छत्रपती संभाजी महाराजांचं हिंदुस्थानाबद्दल किती प्रेम आहे, हे औरंगजेबाला सांगतात. "राजा तो असतो जो संपूर्ण देश स्वतःच्या मुठीत ठेवतो", असं औरंगजेब शंभूराजेंना समजावतो. पण, त्यापुढे औरंगजेबाला सडेतोड उत्तर देऊन शंभूराजे औरंगजेबाची बोलती बंद करतात. "मला माझा हिंद प्रांत माझ्या मुठीत ठेवायचा नाहीये... तर त्याला स्वतंत्र बघायचंय...", असं औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराज म्हणतात. 


दरम्यान, 'छावा' सिनेमानं बक्कळ कमाई केली. या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूडचा अभिनेता विक्की कौशल झळकला होता. तर, महाराणी येसूबाईंची भूमिका साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदानानं साकारलेली. तर, औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नानं साकारलेली. याव्यतिरिक्त 'छावा' सिनेमात मराठी कलाकारही झळकले होते. आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे 'छावा' सिनेमात झळकलेले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bollywood Actor Struggle Life: 350 फिल्म्सचा हिरो, ज्याच्यासोबत नॅशनल अवॉर्ड विनर अभिनेत्रीला करायचं नव्हतं काम, पुढे 'या' दिग्गज अभिनेत्रीनं दिली साथ, आजही इंडस्ट्रीत मिरवतोय 'हा' सुपरस्टार