Bigg Boss 19 Contestants List: बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित शो 'बिग बॉस 19' सुरू झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बिग बॉसच्या घरात कोण जाणार? याच्या चर्चा रंगलेल्या. तसेच, अनेक सेलिब्रिटींची नावंही समोर आलेलं. पण, अखेर नेमकं कोण 'बिग बॉस 19'च्या घरात राहणार? याचा खुलासा झाला. दरवर्षीप्रमाणे यावेळीही एकापेक्षा एक प्रसिद्धीझोतात असलेले चेहेरे 'बिग बॉस'च्या घरात दाखल झाले आहेत.

Continues below advertisement

विशेष बाब म्हणजे, यावेळी 'बिग बॉस'च्या घरात एक मराठमोळा चेहरा सामील झाला आहे. त्याचं नाव प्रसिद्ध कॉमेडीयन आणि युट्यूबर प्रणीत मोरे (Famous Comedian And YouTuber Praneet More). म्हणजेच, चाहत्यांचा लाडका 'महाराष्ट्रीयन भाऊ'. 

'बिग बॉस'चे (Bigg Boss) आतापर्यंत 18 सीझन झाले आहेत. आता 19 वा सीझन सुरू होणार आहे. टीव्हीसोबतच हा सीझन चाहते ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहू शकतात. चाहते यासाठी खूप उत्सुक आहेत. त्यात अनेक टीव्ही कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असतील. तसेच, 'बिग बॉस 19' साठी स्टँड-अप कॉमेडियन प्रणितच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. 

Continues below advertisement

बिग बॉसचा स्पर्धक प्रणित मोरे कोण?

मराठमोळा प्रणित मोरे हा प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आहे. प्रणितनं त्याच्या क्लासी कॉमेडी टायमिंगनं अनेकांची मनं जिंकली आहेत. तसेच, अनेकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. आतापर्यंत त्यानं अनेक कॉमेडी शो केले आहेत. त्याचं युट्यूबवरही स्टँड अप कॉमेडीचं चॅनल आहे. इंस्टाग्रामपासून युट्यूबपर्यंत, प्रणितच्या व्हिडीओंना लोकांकडून खूप प्रेम मिळतं.

सोशल मीडियावर प्रणीत मोरेच्या स्टँड कॉमेडीची प्रचंड क्रेझ 

प्रणित मोरेनं फार कमी दिवसांत सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. तसेच, युट्यूबवरही त्याचे अनेक सब्स्क्राइबर्स आहेत.  इंस्टाग्रामवर 2 हजारांहून अधिक पोस्ट पोस्ट करणाऱ्या प्रणितला इंस्टाग्रामवर 4 लाख 31 हजार (431 हजार) लोक फॉलो करतात. त्याचं इंस्टाग्राम अकाउंट त्याच्या कॉमेडी व्हिडीओंनी भरलेलं आहे. तर युट्यूबवर त्याचे 1 मिलियनहून अधिक सब्स्क्रायबर्स आहेत.

कधीकाळी एका बॉलिवूड अभिनेत्यामुळे चर्चेत आलेला प्रणित मोरे 

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेनं आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर विनोद केले आहेत. दरम्यान, अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' (2025) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वीर पहाडियाची खिल्ली उडवणं प्रणितला चांगलंच महागात पडलं. त्याच्या एका शो दरम्यान त्यानं वीर पहाडियावर अनेक विनोद केले. शो संपल्यानंतर, 10-12 लोकांच्या एका गटानं वीरची खिल्ली उडवल्याबद्दल प्रणित मोरेला मारहाण केली. दरम्यान, या प्रकरणात वीर पहाडियानं सांगितलं की, त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. तसेच, अभिनेत्यानं त्यावेळी प्रणित मोरेची जाहीर माफीही मागितली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor Struggle Life: 350 फिल्म्सचा हिरो, ज्याच्यासोबत नॅशनल अवॉर्ड विनर अभिनेत्रीला करायचं नव्हतं काम, पुढे 'या' दिग्गज अभिनेत्रीनं दिली साथ, आजही इंडस्ट्रीत मिरवतोय 'हा' सुपरस्टार