Chhaava Box Office Collection Day 49: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) 50 दिवस पूर्ण करणार आहे. फारच कमी चित्रपट रिलीजनंतर बराच काळ मोठ्या पडद्यावर राहतात आणि चांगली कमाईदेखील करतात. आज थिएटरमध्ये 'छावा'चा 49वा दिवस आहे. आजवर चित्रपटानं किती कमाई केली? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
सलमान खानचा 'सिकंदर' (Sikandar Movie) आणि साऊथचा सुपरपिहट ठरलेला 'एल2 एम्पुरन' (L2: Empuraan) दोन्ही चित्रपटांच्या वादळात 'छावा' बॉक्स ऑफिसवर आपले पाय घट्ट रोवून उभा आहे.
'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
पाच आठवड्यांच्या अधिकृत आकडेवारीनंतर आणि सहाव्या आठवड्याच्या सॅक्निल्कच्या आकडेवारीनुसार, 'छावा'नं 42 दिवसांत 6.2.11 कोटी रुपये कमावले. 43व्या, 44व्या आणि 45व्या दिवशी फिल्मनं अनुक्रमे 1.15, 2 आणि 1.15 कोटींची कमाई केली आहे. तर, 46व्या, 47व्या आणि 48व्या दिवशी चित्रपटानं अनुक्रमे 0.9, 0.55 आणि 0.4 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे चित्रपटानं गेल्या 48 दिवसांत 608.26 कोटींची कमाई केली आहे.
'छावा'च्या आजच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सकाळी 10.40 वाजेपर्यंत चित्रपटानं 0.40 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंतची एकूण कमाई 608.66 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, 'छावा'च्या कमाईचे हे आकडे अंतिम नाहीत, यामध्ये बदल होऊ शकतात.
'पुष्पा 2'चा रेकॉर्ड मोडणार 'छावा'?
'पुष्पा 2'नं 49व्या दिवशी हिंदीतून 38 लाख रुपये कमावले होते. 'छावा'नं 'पुष्पा 2'ला सहज मागे टाकलं आहे. तर, 49व्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत 'छावा'नं 'गदर 2' च्या 0.05 कोटी, 'जवान' च्या 0.17 कोटी आणि 'पठाण' च्या 0.3 कोटी रुपयांच्या कमाईला मागे टाकलं आहे.
दरम्यान, विक्की कौशलनं 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, डायना पेंटी, अक्षय खन्ना आणि विनीत कुमार सिंह यांच्याशिवाय आशुतोष राणा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'छावा'ची मेकिंग कॉस्ट 130 कोटी रुपये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :