Chhaava Box Office Collection Day 26: विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा'नं (Chhaava) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटानं 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे आणि अजूनही न थांबता, थकता 'छावा'ची धुवांधार कमाई सुरूच आहे. खरं तर 'छावा'च्या आकडेवारीनं सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. 26व्या दिवशी 'छावा'नं किती कोटींचं कलेक्शन केलं, सविस्तर जाणून घेऊयात... 


'छावा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ 


सॅकनिल्कच्या अहवालानुसार, छावानं 26 व्या दिवशी म्हणजेच, चौथ्या मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत 4.15 कोटी रुपये जमा केले आहेत. हा चित्रपट 6-7 कोटी रुपये कमाई करेल, असा अंदाज आहे. चित्रपटाचं एकूण कलेक्शन 530 रुपयांच्या पुढे गेलं आहे. अशातच, चित्रपटाच्या 26 व्या दिवसाच्या कमाईचे अधिकृत आकडे अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान, अधिकृत आकडेवारीनंतर आकडे बदलू शकतात. 




विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटानं पहिल्याच दिवशी 31 कोटींची कमाई करून खातं उघडलं. 'छावा'नं दुसऱ्या दिवशी 37 कोटी, तिसऱ्या दिवशी 48 कोटी, चौथ्या दिवशी 24 कोटी, पाचव्या दिवशी 25 कोटी, सहाव्या दिवशी 31 कोटी आणि सातव्या दिवशी 21 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं 219.25 कोटी रुपये कमावले होते. यानंतर, दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं 180.25 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 84.05 कोटी रुपये कमावले.


चित्रपटानं 22 व्या दिवशी 8.75 कोटी रुपये, 23 व्या दिवशी 16.75 कोटी रुपये, 24 व्या दिवशी 10.75 कोटी रुपये आणि 25 व्या दिवशी 6 कोटी रुपये कमावले.


दरम्यान, 'छावा' चित्रपटाची कथा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. विक्की कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय चित्रपटात रश्मिका मंदाना दिसत आहे. रश्मिकानं विक्कीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नानं औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. सध्या हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. विक्की आणि अक्षय यांनी त्यांच्या अभिनयानं चाहत्यांना प्रभावित केलं आहे.