Chhaava Box Office Collection Day 25: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) ब्लॉकबस्टर चित्रपट (Blockbuster Movie) 'छावा' (Chhaava Movie) सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेल्या 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) बक्कळ गल्ला जमवला आहे. फक्त कमाईच केली नाहीतर, या चित्रपटानं भल्याभल्या दिग्गजांना आपल्यासमोर गुडघे टेकायला भाग पाडलं आहे. अशातच 'छावा' रिलीज झाल्यानंतर अनेक नवनवे चित्रपट आले आणि गेले पण 'छावा'चं सिंहासन कुणीच हलवू शकलेलं नाही. खरंतर, या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. रिलीजच्या चौथ्या आठवड्यातही 'छावा' खळबळ माजवत आहे. तसेच, बक्कळ कमाई करत आहे. 'छावा'नं रिलीजच्या 25व्या दिवशी किती कोटींची कमाई केली? हे सविस्तर जाणून घेऊयात...  


'छावा'नं रिलीजच्या 25 व्या दिवशी किती कमावले?


'छावा' हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या ऐतिहासिक चित्रपटात विक्की कौशलनं मुख्य भूमिका साकारली आहे. रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या 25 दिवसांपासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे आणि उत्तम व्यवसाय करत आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसांतच त्यानं आपलं बजेट वसूल केलं आणि तेव्हापासून 'छावा'नं प्रचंड नफा कमावला आहे आणि निर्मात्यांच्या तिजोरीत पैशांची भर टाकली आहे. तरीही, छावाची कमाई थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. 'छावा'नं चौथ्या आठवड्याच्या शेवटीही भरपूर कमाई केली, पण चौथ्या सोमवारी त्याच्या कमाईत लक्षणीय घट झाली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, 



  • 'छावा'नं पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये कमावले होते.

  • 'छावा'नं दुसऱ्या आठवड्यात 180.25 कोटी रुपये कमावले आहेत.

  • तिसऱ्या आठवड्यात चित्रपटानं 84.05 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

  • 22 व्या दिवशी 'छावा'नं 8.75 कोटी आणि 23 व्या दिवशी 16.75 कोटींची कमाई केली.

  • 'छावा'नं 24 व्या दिवशी 10.75 कोटी रुपये कमावले.

  • आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 25 व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.

  • सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या 25 व्या दिवशी म्हणजेच, चौथ्या सोमवारी 6.25 कोटींचा गल्ला जमवला आहे.

  • यासह, 'छावा'ची 25 दिवसांत एकूण कमाई आता 526.05 कोटी रुपये झाली आहे.






'छावा' आता शाहरुख खानच्या 'पठाण'च्या कलेक्शनला मागे टाकणार? 


'छावा'नं इतिहास रचला आहे आणि भरपूर पैसे कमवले आहेत. हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे आणि तो अनेक चित्रपटांचे रेकॉर्डही मोडत आहे. सध्या, हा चित्रपट शाहरुख खानच्या 2023 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट पठाणचा विक्रम मोडण्यापासून फक्त काही कोटी दूर आहे. सॅकनिल्कच्या मते, पठाणचं भारतातील लाईफटाईम कलेक्शन 543.09 कोटी रुपये होतं. तर छावानं 25 दिवसांत 526 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. अशा परिस्थितीत, हा चित्रपट पठाणला मागे टाकण्यापासून फक्त 17 कोटी रुपये दूर आहे. चौथ्या आठवड्यात 'छावा' पठाणचा रेकॉर्ड मोडणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :  


Chhaava Box Office Collection Day 25: 'छावा'ची मोठी झेप, पण अचानक लागला ब्रेक; बॉक्स ऑफिसवरची कमाई घटली, पण...