Chhaava Box Office Collection Day 14: विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) स्टारर 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. 'छावा' छप्पडफाड कमाई करत असून 400 कोटींच्या क्लबच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेल्या 'छावा'नं आतापर्यंत अनेक नवनवे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. चित्रपटानं रिलीजच्या चौदाव्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या गुरुवारी किती कमाई केली? हे सविस्तर पाहुयात...
चौदाव्या दिवशी 'छावा'ची कमाई किती?
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या शौर्याच्या गाथेवर आधारित 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अप्रतिम कामगिरी करत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप प्रेम दिलं. विशेषतः लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विक्की कौशलच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ज्यामुळे चित्रपटाला केवळ आठवड्याच्या शेवटीच नव्हे तर, आठवड्याच्या दिवशीही भरपूर प्रेक्षक मिळत आहेत. परिणामी, 'छावा'ची कमाईही दररोज अनेक कोटींनी वाढत आहे. या चित्रपटानं प्रदर्शित झाल्यानंतर चार दिवसांतच 130 कोटी रुपयांचं बजेट वसूल केलं आणि आता सध्या 'छावा' प्रचंड नफा कमवत आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर,
- 'छावा'नं 31 कोटींची ओपनिंग केली होती.
- पहिल्या आठवड्यात त्याने 219.25 कोटी रुपये कमावले.
- त्यानंतर आठव्या दिवशी 'छावा'नं 23.5 कोटी रुपये कमावले.
- 'छावा'नं नवव्या दिवशी 44 कोटी रुपये कमावले.
- 'छावा' त्रपटाचं दहाव्या दिवसाचं कलेक्शन 40कोटी रुपये आहे
- चित्रपटानं अकराव्या दिवशी 18 कोटी रुपये कमावले
- 'छावा' चित्रपटाचं बाराव्या दिवसाचं कलेक्शन 18.5 कोटी रुपये आहे.
- तेराव्या दिवशी 'छावा'नं 32 कोटी रुपये कमावले.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चोदाव्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या चौदाव्या दिवशी 12 कोटींची कमाई केली आहे.
- यासह, 'छावा' चित्रपटाचं 14 दिवसांत एकूण कलेक्शन आता 398.25 कोटी रुपये झालं आहे.
'छावा'नं चौदाव्या दिवशी मोडला स्त्री 2, जवान आणि दंगलचा रेकॉर्ड
'छावा'च्या कमाईत चौदाव्या दिवशी पहिल्यांदा घट पाहायला मिळाली. चौदाव्या दिवशी 'छावा'नं 15 कोटींपेक्षा कमी कमाई केली. तरिसुद्धा या फिल्मनं स्त्री 2, दंगल, पठान, गदर 2 आणि जवानसह अनेक फिल्म्सचा रेकॉर्ड चक्काचूर केला आहे. 'छावा' चौदाव्या दिवशी चौथी सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली आहे. चौदाव्या दिवसाची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म आहे.
- पुष्पा 2 नं चौदाव्या दिवशी 16.5 कोटी रुपये कमावले.
- 'पीके'नं चौदाव्या दिवशी 14.05 कोटी रुपये कमावले.
- बाहुबली 2 चा चौदाव्या दिवसाचं कलेक्शन 12.75 कोटी रुपये होता.
- छावानं चौदाव्या दिवशी 12 कोटींची कमाई केली.
- स्त्री 2 नं चौदाव्या दिवशी 9.75 कोटी रुपये कमावले.
- जवानची चौदाव्या दिवसाची कमाई 8.6 कोटी रुपये होती.
- दंगलची 14 व्या दिवशी 8.57 कोटी रुपयांची कमाई झाली.
- गदर 2 चा 14 व्या दिवसाचा कलेक्शन 8.4 कोटी रुपये होता.
- चौदाव्या दिवशी 'अॅनिमल'नं 8.3 कोटींची कमाई केली.
- पठाणनं 14 व्या दिवशी 7.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
'छावा' 400 कोटींपासून इंचभर दूर
'छावा' बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. चौदाव्या दिवशी चित्रपटाची कमाई कमी झाली असली तरी, भारतीय बॉक्स ऑफिसवर त्याचा एकूण कलेक्शन आता 398.25 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. यामुळे, हा चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून फक्त इंचभर दूर आहे. शुक्रवारी 'छावा' हा आकडाही ओलांडेल आणि 2025 सालचा पहिला 400 कोटींचा चित्रपटही बनेल. सध्या सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसवर खिळल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान; 400 कोटींच्या क्लबपासून इंचभर दूर, 'बाहुबली 2'ला पुन्हा एकदा 'दे धक्का'