Santosh Juvekar : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारलेला छावा (Chhaava) हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला लोकांनी चांगलीच पसंती दिली. परिणामी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, या चित्रपटात रायाजीची भूमिका करणारा मराठी अभिनेता संतोष जवेकर हा चांगलाच वादात सापडला आहे. त्याने केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. असे असतानाच त्याने याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.


त्यामुळे थोडासा राग येणं साहजिकच आहे


संतोष जुवेकर याने नुकतेच फोकस्ड इंडियन या यूट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने छावा चित्रपटातील भूमिका तसेच त्याने काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानावर सविस्तर भाष्य केलं. वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना "माझी एक आस्था आहे. माझी महाराजांवर निस्सीम भक्ती आहे. मी पुस्तक वाचलेलं आहे. मी इतिहास वाचलेला आहे, मला तो कळलेला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम माझ्या मनावर आहे. त्यामुळे थोडासा राग येणं साहजिकच आहे," असे स्पष्टीकरण संतोष जुवेकर याने दिले आहे. तसेच कोणाला राग येणार नाही? असा सवालही त्याने केलाय. 


अक्षय खन्ना वाईट आहे, असा त्याचा अर्थ होत नाही


पुढे बोलताना, "मला ट्रोल करण्यांपैकी एखादा आज माझ्या जागेवर असता तर त्यानेही हेच केलं असतं. मी असे मत मांडले म्हणजे अक्षय खन्ना वाईट आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.  आमचे जतीन असोशिएट आहेत. त्यांच्यासोबत मी तेव्हा सेटवर गेलो होतो. ते मला म्हणाले की समोर अक्षय खन्ना उभे आहेत, त्यांना भेटायचे का? असा प्रश्न त्यांनी मला केला होता. त्यानंतर मी त्यांना भेटायलाही गेलो होतो. पण अक्षय खन्ना हा औरंगजेबाच्या वेशात होता. मग मला काहीतरी वाटलं आणि मग मी मला भेटायचं नाही,असं म्हणालो," असंही त्याने सांगितलं. अक्षय खन्नाला न भेटण्याच्या निर्णयात माझी हेकेखोरपणाची भूमिका नव्हती, असेही जुवेकरने स्पष्ट केले. 


संतोष जुवेकर नेमकं काय म्हणाला होता? 


संतोष जुवेकरने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने त्याच्या रायाजीच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. सोबतच त्याने मुघलांचे पात्र साकारणाऱ्यांशी मी बोललो नाही, असं तो म्हणालाह होता. "आम्ही जेजे मुघल होते, जेजे मुघलांची पात्र करत होते...  ते कलाकारच आहेत, पण माहीत नाही... मी त्यांच्याशी नाही बोललो. संपूर्ण सिनेमाभर मुघलांमधल्या कोणत्याही पात्राशी मी बोललो नाही," असं विधान केलं होतं. त्यानंतर त्याच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती. 



हेही वाचा :


महाराजांच्या खबरा मुघलांना देणाऱ्या गद्दाराच्या भूमिकेत संतोष जुवेकर; किरण मानेंनी उघडं पाडलं


Chhaava Box Office Collection Day 25: 'छावा'नं चौथा सोमवार गाजवला; फक्त आता काही पावलं अन् 'पठान'चा रेकॉर्ड चक्काचूर, किती कमावले?