Siddharth Jadhav : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्तीनं तिच्या सोशल मीडियावरील नाव बदललून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे. तिनं नावामधील जाधव हे अडनाव हटवल्यानं सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ हा तृप्ती आणि त्याच्या दोन मुलींसोबत ट्रीपला गेला होता. त्यावेळी सिद्धार्थनं केवळ मुलींसोबतचे फोटो शेअर केले होते. 
 
ई-टाईम्सच्या वृत्तानुसार, गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहात नाहीत. पण सिद्धार्थ आणि तृप्तीनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. सिद्धार्थ आणि तृप्तीनं 2007 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. सिद्धार्थ आणि तृप्तीनं झलक दिखला जा या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमधील तृप्ती आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  


सिद्धार्थनं अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचालन देखील सिद्धार्थ करतो. आपल्या हटके स्टाईलनं आणि नृत्यशैलीनं सिद्धार्थ प्रेक्षकांची मनं जिंकतो. अभिनेता रणवीर सिंहसोबत सिद्धार्थन सिम्बा या चित्रपटामध्ये काम केलं. सिद्धार्थनं डान्स महाराष्ट्र डान्स सिझन-1 या शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारली. त्याच्या दे-धक्का, धुराळा आणि टाईमपास या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. लवकरच सिद्धार्थचा दे-धक्का-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थसोबतच मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


हेही वाचा: