Chandramukhi 2 Trailer Out Now : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' अर्थात कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. चंद्रमुखी 2 या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी 2 वरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. अभिनेत्रीचा हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. ज्यामध्ये ती चंद्रमुखीची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.  


काय आहे 'चंद्रमुखी 2' ट्रेलर


ट्रेलरच्या सुरूवातीलाच राघव लॉरेन्स ची दमदार एंट्री आहे. त्यानंतर पुढे चित्रपटाची सुरूवात सुखी कुटुंबापासून होते. जो वाड्यात राहायला येतो. मग तिथे त्याची भेट चंद्रमुखीच्या आत्म्याशी होते. चित्रपटाची संपूर्ण कथा पुन्हा चंद्रमुखीभोवती फिरते.


 



बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हॉरर, सस्पेन्स या प्रकारातील चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. कंगनानं चंद्रमुखी मध्ये एका नर्तिकेची भूमिका केली असून तो राघव लॉरेन्सनं राजा वेट्टीयान राजाची भूमिका साकारली आहे.


'चंद्रमुखी 2' कधी होणार रिलीज? (Chandramukhi 2 Released Date)


'चंद्रमुखी 2' या थरार नाट्य असलेल्या विनोदी सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. पी. वासु यांनी या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कंगना रनौतसह या सिनेमात वडिलेलू, सृष्टी डांगे आणि लक्ष्मी मेनन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाचा आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोन्ही सिनेमांची चाहते आता प्रतीक्षा करत आहेत. 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा 2005 मध्ये आलेल्या पी. वासु दिग्दर्शित सिनेमाचा सीक्वेल आहे. या सिनेमात रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत झळकले होते. आता प्रेक्षकांना 'चंद्रमुखी 2' या सिनेमाचा सीक्वेल आहे. तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 


कंगनाचे आगामी चित्रपट 


कंगना (Kangana Ranaut) ही चंद्रमुखी 2 या चित्रपटाबरोबरच इमर्जन्सी आणि तेजस  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.   कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.  या चित्रपटाचे दिग्दर्शन हे साई कबीर श्रीवास्तव यांनी केले आहे.  'टिकू वेड्स शेरू'  हा चित्रपट अशा एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे, जो मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी स्ट्रगल करत असतो. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Jawan : 'किंग खान'च्या 'जवान'चा विक्रम! अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच रेकॉर्ड ब्रेक कमाई! 2 लाख तिकीटांचा टप्पा पार