Casting Director Mukesh Chhabra Big Revelation: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) सिनेमानं धुमाकूळ घातला आहे. रिलीज होऊन एक दिवस झालेल्या या सिनेमानं कोट्यवधींची कमाई आधीच केली आहे. आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची (Ranveer Singh) मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच या सिनेमाचे कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा (Casting Director Mukesh Chhabra) यांनी आदित्य धरसाठी एक लांबलचक आणि इमोशनल पोस्ट लिहिली आहे. यामध्ये मुकेश छाब्रानं न केवळ आदित्य धरवर स्तुतिसुमनं उधळली आहेत, तर फिल्मच्या शुटिंगवेळी ते स्वतः कुठे होते, याचाही खुलासा केला आहे.
मुकेश छाब्रा यांनी आदित्यसाठी खास पोस्ट लिहिलीय, त्या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केलंय की, आज 'धुरंधर 2' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, पण आजच्या दिवशी पहाटेपर्यंत आदित्य धर चित्रपटाच्या कामात व्यस्त होता. रिलीजच्या दिवशी पहाटेपर्यंत लॅपटॉपसमोर बसून चित्रपटाच्या काही तांत्रिक बाबींवर आणि इतर कामांवर आदित्य लक्ष ठेवून होता. मुकेश यांच्या मते, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सहसा दिग्दर्शक निवांत असून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची वाट बघतात. पण आदित्य मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना सर्वोत्तम अनुभव मिळावा यासाठी अथक मेहनत घेत होता.
मुकेश छाब्रा यांनी आदित्य धर यांना म्हटलंय 'जीनियस' (Mukesh Chhabra On Aditya Dhar)
मुकेश छाब्रा यांनी आदित्य धरसाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "प्रिय आदित्य, खरं सांगायचं तर, सुरुवात कुठून करावी हेच मला समजत नाहीये. तुझी आणि माझी ओळख खूप जुनी आहे. आपण तुझा पहिला चित्रपट एकत्र सुरू करणार होतो, पण तसं काही घडलं नाही. त्यानंतर, आपण तुझा दुसरा चित्रपट बनवणार होतो, पण तेही काही जमून आलं नाही. अनेक वर्षांनंतर, आपले मार्ग पुन्हा एकदा एकत्र आले. आपण 'Article 370' वर एकत्र काम केलं. आणि त्यानंतरही, गोष्टी पूर्णपणे मार्गी लागल्या नाहीत. आणि मग आला 'Dhuranthar'. या सर्व वर्षांमध्ये मी तुला अगदी जवळून न्याहाळलंय. पण मला याची पुसटशीही कल्पना नव्हती की, ज्या व्यक्तीला मी ओळखत होतो, ती व्यक्ती प्रत्यक्षात एक अलौकिक बुद्धिमत्ता, एक खरीखुरा जीनियस होता..."
"तू हा चित्रपट ज्या पद्धतीनं घडवला आहे, त्यातील बारकाव्यांकडे दिलेलं लक्ष, त्यातील दृढ निष्ठा आणि त्यातील उत्कट भावना... पण या सर्वांहूनही अधिक उठून दिसणारी गोष्ट म्हणजे, तुझ्या सभोवतालच्या प्रत्येकाविषयी तू बाळगलेला आदर. तुम्ही इतरांना देत असलेलं आणि त्यांच्याकडून स्वीकारत असलेलं प्रेम खरोखरच अद्वितीय आहे. आणि आता, संपूर्ण देश हा सिनेमा पाहतोय, अनुभवतोय आणि तुझ्याविषयी चर्चा करतोय... या सर्व गोष्टींमधील सर्वात उत्तम भाग कोणता आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? सिनेमाचं चित्रीकरण सुरू असताना, तू मला वारंवार असं म्हणायचास की, "तुम्ही पाहालच, फक्त थोडी वाट बघा आणि मी काय करून दाखवतो ते पहा..." तुम्ही सतत तुमच्या क्षमतांच्या सीमा विस्तारत राहिलात आणि ठामपणे सांगितले की, या चित्रपटाविषयी चर्चा करण्याचं एक कारण तुम्ही प्रत्येकाला नक्कीच द्याल. आणि तुम्ही ते करून दाखवलं. तुम्ही तसं कराल असे म्हणाला होतात, आणि त्यानंतर, तुम्ही खरोखरंच पुढे होऊन ते प्रत्यक्षात उतरवलंय..."
मला तुझी स्वप्नं, तुझ्या कल्पना आणि तुझा तो 'वेडेपणा' माहीतीय : मुकेश छाब्रा (Mukesh Chhabra On Dhurandhar 2)
पुढे बोलताना आदित्य धरबाबत लिहिताना मुकेश छाबरा यांनी लिहिलंय की, "नेमकं याच गोष्टीमुळे हे सर्व अधिकच अविश्वसनीय वाटतं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की, आदित्य, तू खरोखरंच एक खरा हिरो आहेस. तुझ्या या व्हिजनचा एक भाग बनवल्याबद्दल तुझे आभार. आणि मला खात्री आहे की, ही तर केवळ सुरुवात आहे. तुझ्यामध्ये किती क्षमता आहे, यापैकी लोकांना अजून फक्त 50 टक्केच पाहायला मिळालंय. मला तुझी स्वप्नं, तुझ्या कल्पना आणि तुझा तो 'वेडेपणा' माहीत आहे... आणि तू खरोखरंच काय निर्माण करण्याच्या क्षमतेचा आहेस, हे मला ठाऊक आहे. 'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिवेंज' या सिनेमांच्या माध्यमातून तू जे काही साध्य केलं आहेस, येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत लोक या चित्रपटांबद्दल नक्कीच चर्चा करत राहतील..."
आदित्य धरसाठी केलेल्या खास पोस्टमध्ये मुकेश छाब्रा यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पोस्टमध्ये मुकेश छाब्रा म्हणालेत की, "जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर इतकं प्रेम करता, तेव्हाच अशी निष्ठा बघायला मिळते. 'धुरंधर 2' आज रिलीज होतोय पण पहाटे अडीचपर्यंत आदित्यनं चित्रपटावर बारकाईने काम केलं. आदित्यला असं काम करताना पाहून मला त्याचं खूप कौतुक वाटलं. आदित्यच्या याच मेहनतीचं फळ आज बॉक्स ऑफिसवर दिसत आहे..."
दरम्यान, 'धुरंधर: द रिव्हेंज', हा सिनेमा 'धुरंधर 2' म्हणूनही ओळखला जातोय. या सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास, यात रणवीर सिंहनं भारतीय गुप्तहेर 'हमजा अली मझारी'ची भूमिका साकारली आहे. हेरगिरी करण्याच्या उद्देशानं पाकिस्तानात दाखल झालेला हमजा, भारताच्या विरोधात कार्यरत असलेल्या दहशतवादी आणि गुंडांना लक्ष्य करतो. या सिनेमात संजय दत्त, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, मानव गोहिल, गौरव गेरा, राकेश बेदी आणि आर. माधवन या कलाकारांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
