Horoscope Today 19 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 20 मार्च 2026, आजचा वार शुक्रवार आहे. नुकतीच चैत्र महिन्याला सुरूवात झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज स्वामी प्रकट दिन अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस घरात आणि घराबाहेर संघर्ष टाळण्याकडे प्रवृत्ती ठेवा, लगेच हमरी-तुमरी वर आलात तर गोष्टी अंगलट येतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्यावे लागेल, भावंडांशी मतभेद संभवतात.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस व्यवसाय धंद्यात हाती घ्याल ते तडीस न्याल, तेवढी इच्छाशक्ती ग्रह तुम्हाला देणार आहे
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आजचा दिवस कामाच्या बाबतीत थोडी चिकित्सक आणि संशोधन वृत्ती ठेवल्यास कामे लवकर पूर्ण होतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आजचा दिवस महिला मुलांच्या कलाकलाने वागतील, अडचणींवर मात करून अनेक कामे मार्गी लावाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस घरगुती कारणासाठी कमी वेळ दिला जाईल, त्यावरून वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग उद्भवतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस समोरचा प्रतिवादी थोडा कमी पडण्याची शक्यता असल्यामुळे गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस आज उत्तम मनस्वास्थ्य लाभेल, कलाकारांच्या उत्तम कलाकृतींना रसिकांची दाद मिळेल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी आजचा दिवस नेत्रविकाराच्या दृष्टीने डॉक्टर ही सल्ला घेणे क्रमप्राप्त ठरेल, कापड धंदा टेलरिंग व्यवसाय संबंधी निगडित लोकांना भरपूर काम मिळेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस मित्र परिवाराशी मोठ्या प्रमाणात संपर्क येतील, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अभ्यासासाठी चांगला काळ आहे
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस प्रकृतीच्या दृष्टीने थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, त्वचा विकार असणाऱ्यांना औषधोपचार घ्यावा लागेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीसाठी आजचा दिवस मुळव्याध रक्तदाबाच्या विकारांवर पथ्य पाणी सांभाळा, गरजेला तो कामी पडेल काय असे आव्हान देण्याची पाळी येऊ देऊ नका.
ही वाचा>>
Shani Uday 2026: कष्टाचे दिवस संपले, एप्रिलमध्ये शनिदेव बॅक टू अॅक्शन! 5 राशींचं नशीब फळफळणार, पैसा, नोकरी, प्रेमात जबरदस्त लाभ
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
