Dhurandhar 2 Box Office Collection: डिसेंबर 2025 मध्ये रिलीज झालेल्या स्पाय अ‍ॅक्शन थ्रिलर ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंह पुन्हा एकदा ‘धुरंधर द रिवेंज’सह प्रेक्षकांसमोर आले आहेत. वर्षातील बहुचर्चित असलेल्या या चित्रपटाला रिलीजपूर्वीच जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, 18 मार्चला झालेल्या पेड प्रिव्ह्यू शोजमध्येच चित्रपटाने तुफान कमाई करत आपली ताकद दाखवून दिली आहे.  'धुरंधर' (Dhurandhar) पाहिल्यानंतर त्याचा सीक्वल 'धुरंधर : द रिव्हेंज' (Dhurandhar The Revenge) बाबत कमालीची उत्सुकता निर्माण झालीय.

Continues below advertisement

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर'ची सुरुवात कंधार विमान अपहरणाच्या धक्कादायक घटनेने झाली होती. तीच कथा पुढे नेत, 'धुरंधर: द रिव्हेंज' हे स्पष्ट करते की बदलत्या काळानुसार भारताची विचारसरणी आणि रणनीतीसुद्धा बदलली आहे. हा आहे नवा भारत, जो घरात घुसून हत्या करेल. शीर्षकच हे स्पष्ट करते की, ह्यावेळी सूड घेतला जाईल. 

पेड प्रिव्ह्यूतच 50 कोटींचा टप्पा पार

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘धुरंधर 2’ने देशभरातील 12,292 शोजमधून पेड प्रिव्ह्यूमध्ये तब्बल 52.71 कोटी रुपयांचा ग्रॉस कलेक्शन केला आहे. यामधील नेट कमाई 43 कोटी रुपये इतकी झाली आहे. तर वर्ल्डवाइड पातळीवर प्रिव्ह्यू शोजमधूनच चित्रपटाने सुमारे 75 कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे, या कमाईने पहिल्या भागाच्या ओपनिंगलाही मागे टाकले आहे.

Continues below advertisement

पहिल्या दिवशी दमदार सुरुवात

19 मार्च रोजी चित्रपटाची अधिकृत रिलीज झाल्यानंतरही कमाईचा वेग कायम आहे. पहिल्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत चित्रपटाने 36 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पेड प्रिव्ह्यू आणि पहिल्या दिवसाची एकत्रित कमाई 79 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सायंकाळ आणि रात्रीच्या शोजमध्ये ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ऑक्यूपेंसी आणि पुढील अंदाज

पहिल्या दिवशी दुपारपर्यंत चित्रपटाची ऑक्यूपेंसी 28.4 टक्के नोंदवली गेली आहे. संध्याकाळच्या शोजना अधिक गर्दी अपेक्षित आहे. मिळत असलेल्या प्रतिसादावरून ‘धुरंधर 2’ वर्ल्डवाइड ओपनिंग डेवर 200 कोटींचा टप्पा गाठू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतातही 100 कोटींच्या पुढे ओपनिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.