Case File Against Kapil Sharma : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा  (Kapil Sharma) कायद्याच्या कचाट्यात अडकलाय. कपिल शर्मा सध्या आपल्या टीमसोबत कॅनडाच्या दौऱ्यावर आहे. कॅनडा टूरच्या मध्येच कपिल शर्माच्या अडचणी वाढल्या आहेत. कपलि शर्मा विरोधात तक्रार दाखल झाली आहे. कपिल शर्मावर कॉन्ट्रेक्ट पूर्ण न केल्याचा आरोप करण्यात आलाय. हे प्रकरण आताचं नाही, 2015 मधील आहे.  याबाबत आता तक्रार दाखल झाली आहे. 


ई टाइम्सच्या वृत्तानुसार,  Sai USA Inc ने कपिल शर्माच्या विराधात तक्रार दाखल केली आहे.  2015 मध्ये कपिल शर्माने उत्तर अमेरिकामध्ये काही शोसाठी एक कॉन्ट्रेक्ट साइन केले होते. हे काँन्ट्रक्ट त्यानं पूर्ण केलं नाही. अमेरिकेतील प्रसिद्ध शो प्रमोटर अमित जेटली म्हणाले की, 'कपिल शर्माने सहा शो करण्याचं कॉन्ट्रेक्ट केले होते. त्यासाठीची रक्कमही त्याला देण्यात आली होती. पण कपिल शर्माने एकही शो केला नाही. कपिल शर्माने पैसे परत करणार असल्याचं सांगितलं होतं. पण अद्याप पैसे परत केले नाहीत अन् शो ही केले नाहीत. कपिल शर्माकडून काहीही उत्तर देण्यात आलेलं नाही. न्यायालयात जाण्यापूर्वी आम्ही कपिल शर्मासोबत अनेकदा बोलण्याचा प्रयत्नही केला.'  सध्या हे प्रकरण न्यूयॉर्कमधील न्यायालयात आहे. निश्चितच आम्हाला न्याय मिळेल, असेही जेटली म्हणाले. 






आपल्याच शोमधील काही कलाकारांबरोबर कपिलचे वाद समोर आले होते. मात्र काळानुसार वादग्रस्त वातावरणामधून कपिल बाहेर पडला आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला. किकू शारदा, कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर सारख्या कलाकारांनी प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडलं. कपिल शर्मा शो आज प्रत्येकजण पाहतो...