Brahmanandam on Kota Srinivas Rao death : प्रसिद्ध तेलगू अभिनेते आणि माजी भाजप आमदार कोटा श्रीनिवास राव यांचे वयाच्या 83 व्या वर्षी हैदराबादमध्ये निधन झाले. कोटा श्रीनिवास राव यांनी 750 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. खलनायकांच्या भूमिकांमुळे ते लोकप्रिय झाले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, दाक्षिणात्या चित्रपटातील कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे Brahmanandam हे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत. कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाने Brahmanandam यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून ते धाय मोकलून रडले आहेत.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी कोटा श्रीनिवास राव यांना श्रद्धांजली अर्पण केली.
एन. चंद्राबाबू नायडू काय म्हणाले?
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी कोटा कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत एक्सवर लिहिले, “बहुढंगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन अत्यंत दुःखदायक आहे... त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकांमुळे त्यांनी Telugu प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनामुळे तेलगू चित्रपटसृष्टीला मोठा आणि भरून न येणारा तोटा झाला आहे. 199 मध्ये त्यांनी विजयवाडा येथून आमदार म्हणून निवडून येत जनतेची सेवा केली होती.”
रेवंत रेड्डी यांची प्रतिक्रिया
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कोटा राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत एक्सवर लिहिले, “प्रसिद्ध अभिनेते कोटा श्रीनिवास राव गरू यांच्या निधनाने मनाला फार मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. जरी कोटा गरू आज आपल्यात नाहीत, तरी त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकांमुळे ते Telugu जनतेच्या हृदयात सदैव जिवंत राहतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.”
एन. रामचंदर राव यांची प्रतिक्रिया
तेलंगणा भाजपचे अध्यक्ष एन. रामचंदर राव यांनी एक्सवर लिहिले, “पद्मश्री श्री कोटा श्रीनिवास राव गरू यांना आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. माजी उपराष्ट्रपती श्री एम. वेंकय्या नायडू गरू आणि माजी राज्यपाल श्री विद्यसागर राव गरू यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना. ओम् शांती.”
एस.एस. राजामौली यांनी व्यक्त केलं दु:ख
चित्रपट दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनीही एक्सवर शोक व्यक्त करत लिहिले, “कोटा श्रीनिवास राव गरू यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले आहे. ते आपल्या अभिनयकलेचे उस्ताद होते. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेत जणू प्राण ओतले होते. त्यांची पडद्यावरील उपस्थिती खूपच विशेष होती. त्यांच्या कुटुंबियांना माझ्या अंतःकरणपूर्वक संवेदना. ओम् शांती.”
चिरंजीवी यांनीही व्यक्त केला शोक
सुपरस्टार चिरंजीवी यांनी एक्सवर लिहिले, “दिग्गज अभिनेते, बहुआयामी प्रतिभेचे धनी श्री कोटा श्रीनिवास राव यांचे निधन झाले – ही बातमी खूपच दुःखद आहे... विनोदी खलनायक असो, गंभीर खलनायक असो किंवा सहाय्यक भूमिका, त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका इतक्या समर्पकतेने साकारली की ती केवळ तेच करू शकले असते”
इतर महत्त्वाच्या बातम्या
दक्षिणेतील ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन, वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास