Zeenat Aman: करण जोहरच्या कॉफी विथ करण (Koffee With Karan) या कार्यक्रमाच्या आठव्या सीझनचा 12 वा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या एपिसोडमध्ये अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Singh) आणि झीनत अमान (Zeenat Aman) यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. जून्या चित्रपटांबद्दल,सहकलाकारांबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल नीतू कपूर आणि झीनत अमान यांनी चर्चा केली. कॉफी विथ करण या शोमधील रॅपीड फायर राऊंडमधील प्रश्नांची उत्तरं नीतू कपूर आणि झीनत अमान यांनी दिली. त्यांनी दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले.


झीनत अमान यांनी व्यक्त केली इच्छा


कॉफी विथ करण या शोमधील रॅपीड फायर राऊंडमध्ये करण जोहरनं झीनत अमान यांना प्रश्न विचारला, 'सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटाचा सीक्वेल येणार असेल तर त्यामध्ये कोणत्या अभिनेत्रीनं रुपाची भूमिका साकारावी? तुम्हाला काय वाटतं?' या प्रश्नाचं झीनत अमान यांनी उत्तर दिलं, "मला वाटतं दीपिका रुपाची भूमिका चांगल्या पद्धतीनं साकारु शकते." 


करणनं झीनत अमान यांना पुढचा प्रश्न विचारला की, 'तुमच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीनं काम करावं?' तर या प्रश्नाचं झीनत अमान यांनी उत्तर दिलं, 'प्रियांका चोप्रानं काम करावं'






1978 मध्ये रिलीज झालेल्या 'सत्यम शिवम सुंदरम्' या चित्रपटातील रुपा या भूमिकेसाठी झीनत अमान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. शशी कपूर, पद्मिनी कोल्हापुरे यांनी देखील या चित्रपटामध्ये काम केले.


झीनत अमान यांचे चित्रपट


झीनत अमान यांच्या 'हरे रामा हरे कृष्णा', 'सत्यम शिवम सुंदरम', 'रोटी कपडा और मकान' या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. झीनत यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एन्ट्री केली. त्या सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टच्या माध्यमातून त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Zeenat Aman: 'अश्‍लीलता पसरवण्याचा आरोप...'; सत्यम शिवम सुंदरम चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत झीनत अमान यांनी शेअर केली पोस्ट