Bipasha Basu:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) ही काही दिवसांपूर्वी तिचा पती करण सिंग ग्रोव्हरसोबत मालदीवमध्ये तिचा वाढदिवस  साजरा करण्यासाठी गेली होती. बिपाशानं तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. पण आता बिपाशाला तिच्या बर्थ-डे वेकेशनचे फोटो सोशल मीडियावरून हटवावे लागले. त्याच्यामागील कारण कारण आहे? जाणून घेऊयात...


...म्हणून बिपाशानं डिलीट केले फोटो


 जेव्हापासून मालदीवच्या मंत्र्यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य केले आहे, तेव्हापासून मालदीववर बहिष्कार घालण्याची मागणी देशभरातील लोक करत आहेत. अशताच बिपाशानं तिच्या मालदीवच्या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. बिपाशानं या ट्रीपचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.  त्यानंतर बिपाशानं तिचे सोशल मीडियावरील फोटो हटवले.






नेमकं प्रकरण काय?


पीएम नरेंद्र मोदींनी त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते, जे खूप व्हायरल झाले. त्यानंतर मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर कमेंट केली. त्यांनी व्हिजिटमालदीव ट्रेंडद्वारे प्रवाशांना त्यांच्या देशात भेट देण्यास सांगितले. मात्र, नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले. त्यानंतर मालदीवच्या विरोधात बहिष्काराचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला.   सलमान खानही या मोहिमेत सामील झाला. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, लक्षद्वीप सुंदर आणि स्वच्छ आहे. सलमानशिवाय अक्षय कुमारही पीएम मोदींच्या समर्थनात उतरला आहे. त्याने ट्विट करून चाहत्यांना लक्षद्वीपला जाण्याचे आवाहन केले.






 धूम 2, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे.बिपाशा आणि करण यांनी  2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. बिपाशाने 12 नोव्हेंबर 2022 रोजी देवीला जन्म दिला. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Maldives vs Lakshadweep : मालदीव की लक्षद्वीप कोणतं डेस्टिनेशन आहे बेस्ट? दोघांमधील फरक सविस्तर जाणून घ्या