Adipurush Teaser: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभासच्या (Prabhas) 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या टीझरला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. काहींनी या टीझरमधील सैफ अली खानच्या लूकवर टीका केली. आता या चित्रपटातील एक अंडरवॉटर सीन एका युट्यूबर आणि VFX आर्टिस्टनं रिक्रिएट केला आहे.
आदिपुरुष चित्रपटातील अंडरवॉटर सीन रिक्रिएट करत एक शॉर्ट व्हिडीओ युट्यूबर आणि VFX आर्टिस्ट कुंवरनं तयार केला. या शॉर्ट व्हिडीओच्या मेकिंगचा व्हिडीओ कुंवरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. 'मी आणखी चित्रपटांचे सीन्स रिक्रिएट करावेत, असं तुम्हाला वाटतं का?' असं कॅप्शन कुंवरनं या व्हिडीओला दिलं आहे. कुंवरच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
कुंवरच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'ओरिजनल सिनपेक्षा भारी केलंस.' '500 कोटी खर्च करुन केलेल्या वीएफएक्सपेक्षा हे चांगलं दिसत आहे.', तू खूप टॅलेंटेड आहेस.' अशाही कमेंट्स युझर्सनं केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
आदिपुरुष हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Adipurush: ओम राऊतनं दिलं चाहत्यांना गिफ्ट; आदिपुरुषचं नवं पोस्टर रिलीज