Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीच्या सीझन 2 (Bigg Boss OTT 2) ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये  कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत? जे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या कार्यक्रमाच्या  गेल्या सीझनमध्ये विविध सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्यामधील दिव्या अग्रवाल ही बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनची  विजेती ठरली होती. आता बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) सहभागी होणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आता या चर्चेवर आदित्यनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. 


आदित्य नारायणची पोस्ट


गायक आदित्य नारायणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून  आदित्यनं चाहत्यांना माहिती दिली आहे की, तो कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये भाग घेणार नाही. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'खतरों के खिलाडी' माझा पहिला आणि शेवटचा रिअॅलिटी शो होता जिथे चाहत्यांनी मला स्पर्धक म्हणून पाहिलं. हा आयुष्यात एकदा घेतलेला अनुभव आहे आणि तो नेहमीच लक्षात राहील.' आदित्यच्या या पोस्टवरुन लक्षात येतं की तो  बिग बॉस ओटीटी 2 मध्ये  सहभागी होणार नाहीये.



'लॉक अप'चा विजेता मुनावर फारुकी देखील बिग बॉस ओटीटी-2 मध्ये सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे. तसेच फहमान खान, उमर रियाज, राजीव सेन, पूजा गोर, संभावना सेठ हे सेलिब्रिटी देखील बिग बॉस ओटीटी-2 मध्ये सहभागी होणार आहे, अशी चर्चा होता आहे. अर्चना गौतमचा भाऊ गुलशन देखील 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये सहभागी होणार आहे, अशी चर्चा आहे. 


'बिग बॉस ओटीटी 2' जूनच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. हा शो 3 महिने दाखवला जाईल. हा शो टीव्हीऐवजी OTT प्लॅटफॉर्मवर देखील प्रेक्षकांना बघता येणार आहे.  Voot या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन तुम्ही पाहू शकणार आहात. 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' चे होस्टिंग सलमान खान करणार आहे. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालन करण जोहर यानं केलं होतं. 


इतर महत्वाच्या बातम्य:


Bigg Boss OTT Season 2 Updates: करण जोहर नाही तर सलमान खान होस्ट करणार 'बिग बॉस ओटीटी 2'; कोणते कलाकार शोमध्ये होणार सहभागी?