Keerthy Suresh Wedding Rumours : दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश (Keerthy Suresh) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. उद्योगपती फरहान बिन लियाकतसोबत किर्ती लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. पण आता अभिनेत्रीने या चर्चांवर मौन सोडलं आहे. ट्वीट करत तिने नेटकऱ्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला आहे. 


अभिनेत्री किर्ती सुरेश आणि उद्योगपती फरहान बिन लियाकत गेल्या काही दिवासांपासून रिलेशनमध्ये असून आता लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तसेच दोघांच्याही घरी लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाल्याचं म्हटलं जात होतं. पण आता या सर्व चर्चांवर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. 






किर्तीने ट्वीट केलं आहे की,"हाहाहा! असं काही नाही आहे...माझ्यासोबत माझ्या मित्राचं नाव उगाचं जोडणं चुकीचं आह... ज्यावेळी मी लग्न करणार असेल त्यावेळी होणाऱ्या पतीबद्दल तुम्हाला नक्की माहिती देईल. पण तोपर्यंत शांत राहा". किर्ती सुरेशचं हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. 


किर्ती सुरेशच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Keerthy Suresh Movies)


किर्ती सुरेशला 'दसरा' (Dasara) या सिनेमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या सिनेमात ती मुख्य भूमिकेत असून दाक्षिणात्य अभिनेता नानीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. या सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी किर्तीने सेटवरील सर्वांना सोन्याचे नाणे भेट म्हणून दिले होते. या नाण्यांची किंमत 70 लाख रुपये होती. 


किर्तीचा 'मामन्न' (Maamannan) हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तसेच तिच्या आगामी 'भोलाशंकर' या सिनेमाचीदेखील चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमात ती चिरंजीवीच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सायरन', र'घु थाथा' आणि 'रिवॉल्वर रीटा' हे किर्तीचे आगामी सिनेमे आहेत. किर्ती सुरेशला अल्पावधीतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. 


संबंधित बातम्या


Keerthy Suresh : बॉडी कॉन ड्रेसमध्ये किर्तीच्या हॉटनेसचा कहर, नव्या फोटोंनी वाढवलं तापमान