Youtube Top 10 Music Videos : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) यांच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट रिलीज होऊन जवळपास एक वर्ष झाले, तरी देखील या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. पुष्पा (Pushpa: The Rise) या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला, डायलॉग्सला तसेच चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील गाणी देखील हिट ठरली. युट्यूबनं 2022 मधील टॉप 10 ट्रेंडिंग व्हिडीओ, टॉप 10 म्युझिक व्हिडीओ आणि टॉप 10 शॉर्ट्स अशा विविध कॅटेगरीमधील भारतातील लोकप्रिय व्हिडीओंची यादी जारी केली आहे. या यादीमधील टॉप-10 म्युझिक व्हिडीओच्या यादीत पुष्पाच्या चार गाण्यांचा समावेश आहे. 


युट्यूबची यादी-


1. युट्यूबनं जाहीर केलेल्या 2022 मधील टॉप-10 म्युझिक व्हिडीओच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली हे गाणं आहे. या गाण्यातील अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 



2. अरबीक कुथू हे बीस्ट चित्रपटामधील गाणं युट्यूबच्या टॉप-10 म्युझिक व्हिडीओच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 



3. पुष्पा चित्रपटातील सामी सामी हे गाणं तिसऱ्या क्रमांकावर आहे. 



4. भुवन बडायकर नावाचे गायक शेंगदाणे विकताना 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' म्हणत होते. त्यानंतर त्यांचं गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. त्यानंतर या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन युट्यूबवर शेअर करण्यात आलं. आता हे गाणं युट्यूबनं जाहीर केलेल्या 2022 मधील टॉप-10 म्युझिक व्हिडीओच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. 



5. लेले आई कोका कोला गाणे हे गाणे या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. 


6. पुष्पा चित्रपटातील 'ओओ बोलेगा या ओओ ओओ बोलेगा' हे गाणं या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. या गाण्यातील समंथाच्या डान्सनं अनेकांची मनं जिंकली.



7.  ओ अंटवा  या पुष्पा चित्रपटाच्या हिंदी व्हर्जन हे या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. 



8.  अली सेठी आणि शे गिल यांच्या पसूरी या गाण्यानं देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या गाण्यानं या यादीत आठवे स्थान मिळवले आहे. 


अरबीक कुथू  हे नवव्या आणि केसरी लाल न्यु साँग हे दहाव्या क्रमांकावर आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 6 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!