Shah Rukh Khans Pathaan Look:  बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असाणारा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याचा पठाण  (Pathaan)  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे करणार आहेत. पठाणचं नवं पोस्टर नुकतच प्रदर्शित झालं असून या पोस्टरमधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत.  


यश राज फिल्म्सनं शेअर केली पोस्ट 


यश राज फिल्म्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पठाण चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर करण्यात आला आहे. हा पोस्ट शेअर करुन त्याला खास कॅप्शन देखील देण्यात आलं आहे.  'यश राज फिल्म्सचा पठाण मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.' असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे, असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे. 


शाहरुखचा लूक


पठाणच्या या नव्या पोस्टरमध्ये शाहरुख हा हटके लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या हातात बंदुक दिसत असून तो डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी पोस्टरला कमेंट करुन शाहरुखच्या या लूकचं कौतुक केलं आहे. 






'पठाण' व्यतिरिक्त शाहरुख राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या आगामी चित्रपटामध्येही प्रमुख भूमिका साकारणार आहे.  तसेच त्याचा 'जवान' हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 6 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!