मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता फरहान अख्तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची जोरदार चर्चा आहे. इतकंच नाही तर ही बाब समजल्यानंतर श्रद्धाचे वडील आणि अभिनेता शक्ती कपूर फरहानच्या घरी केले आणि तिथून श्रद्धाला फरफटत घेऊन गेले, अशीही अफवा होती. मात्र यावर चर्चांवर श्रद्धा कपूरने मौन सोडलं आहे.
श्रद्धा कपूरला याबाबत विचारलं असता ती म्हणाली की, "तुझ्याबद्दल अशा बातम्या पसरल्या आहेत, असा कोणाचा तरी मेसेज मला आला होता. तो वाचून फार हसू आलं, कारण ही बातमी खोटी असल्याचं मला माहित होतं. त्यामुळे मला फरक पडत नाही. मी एक कलाकार आहे आणि लोकांना कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. मात्र माझे वडील, मावशी आणि सहकलाकारांचा उल्लेख झाल्यास ते चुकीचं आहे. होय, मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे, पण माझ्या कुटुंबासोबत. माझे कुटुंबीय मला चिडवतात की मी माझ्या पतीला घरजावई बनवेन, कारण मला माझ्या कुटुंबासोबत राहायला आवडतं. मला माझ्या कुटुंबीयांना सोडायचं नाही, त्यामुळे अशा अफवा पसरवू नका." दरम्यान, श्रद्धा कपूरचा 'ओके जानू' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर प्रमुख भूमिकेत आहे.