- शुक्रवारी (पहिला दिवस) – 29.78 कोटी
- शनिवार (दुसरा दिवस) – 34.82 कोटी
- रविवार (तिसरा दिवस) – 42.41 कोटी
- सोमवार (चौथा दिवस) – 25.69 कोटी
- मंगळवार (पाचवा दिवस) – 23.09 कोटी
- बुधवार (सहावा दिवस)- 21.46 कोटी
- गुरुवार (सातवा दिवस)- 20.29 कोटी
- शुक्रवार (आठवा दिवस)- 18.59 कोटी
- शनिवार (नववा दिवस)- 23.07 कोटी
- रविवार (दहावा दिवस)- 31.27 कोटी
- दहा दिवसात एकूण – 270.47 कोटी रुपये
बॉक्स ऑफिसवर आमीरच्या 'दंगल'चा दहाव्या दिवशीही धुमाकूळ कायम
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2017 03:28 PM (IST)
मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या 'दंगल' या सिनेमाने प्रदर्शनापासून अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. आमीरच्या दंगलने या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवरील आपल्या कमाईचा वेग कायम राखला असून गेल्या दहा दिवसात या सिनेमाने एकूण 270.47 कोटीची कमाई केली असून, चालू आठवड्यात 300 कोटीचा टप्पा सहज पार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या 10 दिवसातील 'दंगल' सिनेमाची कमाई पाहिली, तर पहिल्या दिवशी 29.78 कोटी, दुसऱ्या दिवशी 34.82 कोटी, तिसऱ्या दिवशी 42.41 कोटी, चौथ्या दिवशी 25.69 कोटी, पाचव्या दिवशी 23.09 कोटी, सहाव्या दिवशी 21.46 कोटी, सातव्या दिवशी 20.29 कोटी, आठव्या दिवशी 18.59 कोटी, नवव्या दिवशी 23.07 कोटी, आणि दहाव्या दिवशी 31.27 कोटीची कमाई केली. सिनेमा ट्रेड अनॅलिस्ट तरन आदर्श यांनी ट्वीट करुन दंगलच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. 'दंगल'ने प्रदर्शनापासून बॉक्स ऑफिसवर तीनच दिवसात 100 कोटीचा गल्ला गोळा केला होता. कमी दिवसात हा टप्पा पार करणारा आमीराचा हा पाचवा सिनेमा असून 2014 मधील 'पीके', 2013 मधील 'धूम-2', 2009 मधील 'थ्री इडियटस' आणि 2008 मधील 'गजनी'ने हा विक्रम रचला होता. ‘दंगल’ची भारतातील आतापर्यंतची कमाई :