Year Ender 2022: 2022 (Year Ender 2022) हे वर्ष काही मराठमोळ्या सेलिब्रिटींसाठी खास होते. मराठी चित्रपट आणि मालिकांमधील काही कलाकारांनी 2022 मध्ये लग्नगाठ बांधली. कोणत्या कलाकारांचा विवाह सोहळा 2022 मध्ये  झाला, ते पाहूयात...


रोहित राऊत (Rohit Raut)  आणि जुईली जोगळेकर (juilee joglekar)


23 जानेवारी 2022 रोजी गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांनी लग्नगाठ बांधली. पुण्यातील ढेपेवाड्यात रोहित आणि जुईली यांनी लग्नगाठ बांधली. रोहित आणि जुईली यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 






हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रतीक शाह (Prateek Shah) 


18 मे 2022 रोजी अभिनेत्री हृता दुर्गुळे  ही  प्रतीक शाहसोबत  लग्नबंधनात अडकली आहे.  प्रतीक हा अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद 2', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीक शाहने केलं आहे. तर हृता ही मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. 






विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni)  आणि शिवानी रांगोळे  (Shivani Rangole) 


अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे  यांनी 3 मे रोजी  लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. विराजस आणि शिवानी यांच्या चाहत्यांनी तसेच अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 






नेहा कुलकर्णी (Neha Joshi) आणि ओमकार कुलकर्णी


अभिनेत्री नेहा कुलकर्णीनं 16 ऑगस्ट 2022 रोजी ओमकार कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली. नेहानं तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 






अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi)
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली राणादा आणि पाठकबाईंची रिल जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी  हे 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Year Ender 2022: कांतारा ते आरआरआर; 2022 मध्ये साऊथ चित्रपटांचा बोलबाला