मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात शूटिंग थांबल्यामुळे काही मालिकांचे आणि वेब शोचे शूटिंग इतर राज्ये आणि देशातील काही शहरांमध्ये सुरु आहे. परंतु ही संख्या पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा लाखो रोजंदारी कामगार, तंत्रज्ञ आणि चित्रपटसृष्टीतील ज्युनियर आर्टिस्ट यांच्यासमोर रोजीरोटीचं मोठं संकट उभं राहिलं आहे. पण मागील वर्षाप्रमाणे यावेळेस बॉलिवूडमधील बड्या स्टार्स आणि निर्माते / दिग्दर्शकांकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. दरम्यान, चांगली बातमी अशी आहे की यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा यांनी बॉलिवूडशी संबंधित हजारो रोजंदार मजुरांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.


फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) सरचिटणीस अशोक दुबे यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, यशराज फिल्म्सने आमच्याशी संपर्क साधला आहे आणि त्यांना आमच्या संस्थेशी संबंधित सर्व मजुरांचं मोफत लसीकरण करण्याची ऑफर दिली आहे. मात्र किती कामगारांना मोफत लस दिली जाणार याबाबत स्पष्टीकरण नाही. मात्र लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.


Maharashtra Covid 19 Vaccination : महाराष्ट्राला मोफत लस कधी? उपमुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती 


गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये शूटिंग पूर्ण बंद झाल्याने यशराज फिल्म्सने 3000 मजुरांना एकूण दीड कोटींची आर्थिक मदत केली होती. प्रत्येकाच्या खात्यात 5000 रुपये आणि धान्याची मदतही यशराज फिल्म्सने केली होती.


Maharashtra covid19 vaccination: लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी राज्य सरकार ग्लोबल टेंडर काढणार : अजित पवार 


अशोक दुबे यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, फिल्म सिटीमध्ये दररोज काम करण्यासाठी हजारो मजूर येत असतात. या मजुरांच्या लसीकरणासाठी मुंबईतील फिल्म सिटी येथे स्वतंत्र लसीकरण शिबीर घेण्यात यावं, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. बॉलिवूडकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. आम्ही गरजू दैनंदिन मजुरांना मदत करण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले होते. परंतु अद्यापपर्यंत राज्य सरकारकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असं दुबे यांनी सांगितलं. 


COVISHIELD Prices Controversy : 'उत्पादन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची गरज', कोविशिल्डच्या किंमतीवरील चर्चेवर सीरमचं स्पष्टीकरण