मुंबई : कुठल्या सिनेमाचा फक्त ट्रेलरच 7 तास 20 मिनिटांचा आहे किंवा सिनेमा 720 तासांचा आहे, असं कधी ऐकलं आहे का? जर ऐकलं नसेल, तर आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 2020 साली एक हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे, ज्याचा फक्त ट्रेलर 7 तास 20 मिनिटांचा असून, संपूर्ण सिनेमा संपण्यासाठी तब्बल एक महिना लागणार आहे.


 

एंबियन्स… 7 तासांचा ट्रेलर आणि 720 तासांचा सिनेमा

 

या सर्वाधिक लांबीच्या सिनेमाचे दिग्दर्शक स्वीडनमधील आहेत. ‘अॅम्बियन्स’ असे या सिनेमाचे नाव असून, सिनेमाचा पहिला ट्रेलर रिलीज झाला आहे, तर दुसरा ट्रेलर 2018 साली रिलीज करण्यात येणार आहे. संपूर्ण सिनेमा 720 तासांचा असेल, असा दावा करण्यात येत आहे. म्हणजेच हा सिनेमा संपण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागेल.

 

सिनेमाची कथा काय आहे?

 

‘अॅम्बियन्स’ सिनेमाची कथा दोन कलाकारांवर आधारित आहे. दोन्ही कलाकार दक्षिण स्वीडनमच्या समुद्र किनाऱ्यावर भेटतात आणि तिथेच संपूर्ण सिनेमाचं कथानक फिरतं.

 

वन टेकमध्ये संपूर्ण सिनेमाचं शूटिंग

 

संपूर्ण सिनेमा सिंगल शॉटमध्ये तयार केल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात एकही कट नसल्याची माहिती मिळते आहे. अशाप्रकारे एखाद्या सिनेमाचं चित्रिकरण करणं सोपं नसतं, असे म्हटलं जातं. 21 डिसेंबर 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

पाहा 7 तास 20 मिनिटांचा ट्रेलर: