मुंबई : रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना ‘सुलतान’ची साथ मिळणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानची रिओ ऑलिम्पकसाठी भारताचा गुडविल अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे.


https://twitter.com/BeingSalmanKhan/status/723825850420842496

भारतीय संघाचा गुडविल अॅम्बेसेडर म्हणून एखाद्या अभिनेत्याची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवी दिल्लीत एका खास कार्यक्रमात भारपतीय ऑलिम्पिक संघटनेनं सलमान खानच्या नावाची घोषणा केली.

 

यावेळी ऑलिम्पिक कांस्यविजेती बॉक्सर मेरी कोम, तिरंदाज दीपिका कुमारी, नेमबाज अपूर्वी चंडेला, तसंच हॉकीपटू रितू राणी आणि सरदार सिंगही उपस्थित होते. स्वतः सलमान खान लवकरच कुस्ती या खेळावर आधारीत सुलतान या चित्रपटात झळकणार आहे.