World No Tobacco Day:  31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन  (World No-Tobacco Day) आहे. तंबाखूचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. काही बॉलीवूड स्टार्स असे आहेत ज्यांनी स्वत:च्या आरोग्याचा विचार करुन धूम्रपान सोडले आहे. आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ता जाणून घेऊया त्या कलाकारांबद्दल, ज्यांनी सिगारेट सोडली आहे. 


सलमान खान (Salman Khan)


बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खान हा एकेकाळी चेन स्मोकर होता. तो दिवसातून अनेक सिगारेट ओढत होता, पण त्याला  फेशियल नर्व डिसऑर्डर असल्याने त्याने धूम्रपान सोडले आहे.






हृतिक रोशन (Hrithik Roshan)



'कहो ना प्यार है' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणाऱ्या हृतिक रोशनचा चाहता वर्ग मोठा आहे.  हृतिक  हा त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. काही वर्षांपूर्वी हृतिकला सिगारेट ओढण्याची सवय होती.पण आता त्यानं सिगारेट सोडली आहे. 






अर्जुन रामपाल (Arjun Rampal)



सिगारेटसारखी वाईट सवय सोडण्यात हृतिक रोशन यशस्वी झाला, त्यानंतर त्याने आपला मित्र अभिनेता अर्जुन रामपाललाही या सवयीमधून बाहेर काढण्याचा विचार केला. हृतिकने ज्या पद्धतीने सिगारेट सोडली होती, अर्जुननेही तीच पद्धत अवलंबून धूम्रपानाची सवय सोडवली.






कोंकणा सेनशर्मा (Konkona Sen Sharma)



अभिनेत्री कोंकणा सेनशर्मा ही आधी चेन स्मोकर होती, पण जेव्हा ती प्रेग्नंट झाली तेव्हा तिने  धूम्रपान करणे सोडले.






महत्वाच्या बातम्या : 


World No Tobacco Day: रोजचाच दिवस असू दे तंबाखू विरोधी दिवस!