World Cup 2023: भारताविरुद्ध न्यूझीलंडमध्ये झालेल्या  विश्वचषक 2023 च्या (World Cup 2023) सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्यातील विराट कोहलीच्या वादळी खेळीचं अनेक जण कौतुक करत आहेत. विराटनं 104 बॉलमध्ये 95  रन्स केले. नुकताच विराटची पत्नी अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन  विराट कोहलीच्या (Virat Kohli) या वादळी खेळीचं भरभरुन कौतुक केलं आहे. अनुष्काच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


अनुष्काने विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामध्ये लिहिलं होतं, “भारत 4 विकेट्सने जिंकला” या फोटोला अनुष्कानं कॅप्शन दिलं,  'स्टॉर्म चेजर'. 




त्यानंतर अनुष्कानं तिच्या इन्स्टा स्टोरीवर विराटचा सामन्यातील एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये विराट हा कॅच आऊट झालेला दिसत आहे. अनुष्कानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, मला नेहमीच तुझा अभिमान वाटतो.




कोहलीने 95 धावांवरून उत्तुंग षटकार ठोकून शतक करण्याचा प्रयत्न केला, पण तो कॅच आऊट झाला.  हा प्रसंग हाॅटस्टारवर तब्बल 4.30 कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला.  






अनुष्का ही नेहमी सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करुन विराटचं कौतुक करत असते.  विश्वचषकाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात  विराट कोहलीने 85 धावांची झुंजार खेळी केली.या सामन्यात  टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर आता अनुष्का शर्मानं   विराटचा खास फोटो शेअर करुन आनंद व्यक्त केला होता.


2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. जानेवारी 2021 मध्ये अनुष्कानं मुलीला जन्म दिला.  विराट कोहली आणि   अनुष्का शर्मा ही जोडी पावर कपल म्हणून ओळखली जाते. अनुष्का आणि विराट गहे दोघेही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विराट आणि अनुष्का हे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होती. पण याबाबत अजून विराट आणि अनुष्का यांनी भाष्य केलेलं नाही. अनुष्काचे चाहते सध्या तिच्या 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटाची वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराटची झुंजार खेळी; टीम इंडियाच्या विजयानंतर अनुष्का शर्मा व्यक्त केला आनंद; पतीचा खास फोटो केला शेअर