Virat Kohli Anushka Sharma World Cup 2023 Emotional Photo : 'वर्ल्ड कप 2023'च्या (World Cup 2023) फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा (IND Vs AUS) सहा विकेटने पराभव करत सहाव्यांदा चषकावर नाव कोरले. भारताच्या पराभवानंतर क्रिकेट चाहते नाराज झाले. दरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विरुष्का खूपच भावुक दिसत आहेत. 


भारताच्या पराभवानंतर विराट-अनुष्काचा फोटो व्हायरल (Virat Kohli Anushka Sharma Photo Viral)


भारताच्या पराभवानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. या फोटोमध्ये अनुष्का शर्मा विराट कोहलीला मिठी मारताना दिसत आहे. हा फोटो पाहून चाहतेदेखील भावूक झाले आहेत. विराट आणि अनुष्काचा हा फोटो चाहते सोशल मीडियावर शेअर करत असून अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. 






विराट अनुष्काच्या व्हायरल फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पत्नी हवी तर अशी, अनुष्का तू कमाल आहे, थँक्यू अनुष्का...आमच्या हीरोला सांभाळल्याबद्दल, अनुष्का कायमच विराटच्या पाठीशी, पराभवाच्या दु:खात अनुष्का विराटच्या पाठीशी ठाम, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काही नेटकरी मात्र विराट आणि अनुष्काला ट्रोल करत आहेत. 






विराट कोहलीचं अर्धशतक


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने जोरदार फलंदाजी केली. विश्वचषकात सर्वाधिक 50+ स्कोर करण्याचा रेकॉर्डही विराट कोहलीने केला आहे. विराट कोहलीच्या या खेळीची सर्वत्र चर्चा होत आहे. कोहलीच्या नावावर अनेक विराट विक्रम आहेत. या विश्वचषकात किंग कोहलीची बॅट चांगलीच तळपळली.


फायनलचा महामुकाबला पाहायला सेलिब्रिटींची मांदियाळी 


भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहायला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शाहरुख खान, गौरी खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, आशा भोसले, अनुष्का शर्मा, अथिया शेट्टीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.


संबंधित बातम्या


World Cup Final: शाहरुखपासून दीपिकापर्यंत! फायनलचा महामुकाबला पहायला कलाकारांची मांदियाळी जमली