World Cup 2023: भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामना (IND vs PAK) शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विश्वचषक 2023 (World Cup 2023) च्या 12 व्या सामन्यापूर्वी एका ग्रँड सेरेमनीचे आयोजन करण्यात आले आहे. या सेरेमनीमध्ये काही गायक परफॉर्म करणार आहेत. याबाबत बीसीसीआयनं (BCCI) ट्विटरवर माहिती दिली आहे.
गायक अरिजित सिंह (Arijit Singh), शंकर महादेवन (Shankar Mahadevan) आणि सुखविंदर सिंह (Sukhwinder Singh) हे भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामन्याच्या आधी होणाऱ्या सेरेमनीमध्ये परफॉर्म करणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयनं ट्विटरवर दिली आहे. "जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावरील 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता सुरू होणार्या प्री-मॅच शोचा अनुभव घ्या!" असं बीसीसीआयनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी जगभरातून चाहते आले आहेत. या सामन्याची तिकिटे खूप आधी विकली गेली होती. आता हा सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील होणाऱ्या सामन्याच्या आधी होणाऱ्या सेरेमनीमध्ये परफॉर्म करुन अरिजित सिंह, शंकर महादेवन आणि सुखविंदर सिंह हे प्रेक्षकांचा उत्साह आणखी द्विगुणित करतील.
अरिजित सिंह, शंकर महादेवन आणि सुखविंदर सिंह हे गायक भारत-पाकिस्तान सामन्याच्या आधी होणाऱ्या सेरेमनीमध्ये कोणकोणती गाणी गाणार आहात? याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत.
प्रत्येक क्रिकेट प्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची क्रेझ असते. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
IND vs PAK सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी, रजनीकांत- सचिनला आमंत्रण, लाइट शो अन् डान्सही होणार