Tumbbad:  काही चित्रपट असे असतात ज्यांचे मनात एक वेगळे स्थान असते. त्या चित्रपटांचे नाव जरी घेतलं तर डोळ्यासमोर पूर्ण चित्रपट उभा राहतो. असाच तुंबाड (Tumbbad) हा चित्रपट 12 ऑक्टोबर 2018 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाला रिलीज होऊन आज पाच वर्ष झाली आहेत. या चित्रपटाची एक-एक फ्रेम अनेकांच्या आजही लक्षात आहे. चित्रपटाची cinematography, चित्रपटाचे कथानक, चित्रपटातील कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तुंबड या चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं चित्रपटाचा दिग्दर्शक राही बर्वेनं (Rahi Anil Barve) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 


राही बर्वेनं सोशल मीडियावर तुंबाड या चित्रपटाबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "तुंबडच्या रिलीजला 5 वर्षे.. गुलकंदाच्या कहाणीची 4.5 वर्षे प्रगतीपथावर, पहाडपांगिराचे दीड वर्ष विकासात.. "एवढा वेळ का?" असे प्रश्न आहेत. अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं झालं तर, माझ्याकडे तेव्हासुद्धा वेळ होता कदाचित आत्ता जेवढा वेळ आहे त्याहून अधिक वेळ होता, पण त्यावेळी कोणाला कसलीच परवा नव्हती, किमान आत्ता तरी काही लोकांना मी जे काही करतोय त्याबद्दल काहीतरी वाटतं ही देखील चांगली गोष्ट आहे, आणि त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पण तरी काही लोक विचारतात की पाच ते दहा वर्षं का? यासाठी माझ्याकडे उत्तर नाही. आपण जे काम करतो आहोत ते प्रथमदर्शनी आपल्यालाच आवडलं नाही तर ते इतरांनाही निश्चितच आवडणार नाही."


तुंबाड चित्रपटामधील "सो जा वरना हस्तर आ जाएगा" हा डायलॉग देखील अनेकांना लक्षात असेल. तुंबाड चित्रपटामधील हस्तर हा आजही जर स्क्रिनवर आला तरी अनेकांच्या अंगावर काटा येईल. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुंबाड हा चित्रपट पाहू शकता.  तुंबाड चित्रपटातीमध्ये सोहम शहा,ज्योती माळशे, धुंडिराज प्रभाकर, अनिता दाते या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.






तुंबाड चित्रपटानंतर आता राही बर्वेच्या ‘गुलकंद टेल्स’ या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Rahi Anil Barve: तुंबाडनंतर राही बर्वे यांचा आगामी प्रोजेक्ट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो