इस्लामाबाद : इकडे देशात 'पद्मावत'च्या विरोधात जाळपोळ, तोडफोड सुरु असताना तिकडे पाकिस्तानात आता ‘पद्मावत’ प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, कुठल्याही 'कट'कटीशिवाय पाकच्या सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख मोबशिर हसन यांनी पद्मावतला यू सर्टिफिकेटही दिलं आहे.


‘इतिहासावरून होणारे वाद टाळण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या इतिहासकारांशी, तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांना चित्रपट दाखवला. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो आणि मनोरंजनाच्या हेतूनं बनवलेल्या कोणत्याच कलाकृतीच्या विरोधात नाही, त्यामुळं पाकिस्तानात 'पद्मावत' प्रदर्शित होण्यात कोणतीच अडचण नाही,' असं त्यांनी स्पष्ट केलं.

दुसरीकडे, भारतात मल्टिप्लेक्स असोसिएशनने राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ पदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात मल्टिप्लेक्स असोसिएशनच्या सुमारे 1800 ते 2 हजार स्क्रीन आहेत. त्यामुळे चार राज्यातील प्रदर्शन बंद राहिल्यास ‘पद्मावत’ सिनेमाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या चारही राज्यात राजपूत समाजाच्या संघटना आक्रमक असल्यानं सिनेमागृह चालकांनी स्वतःच सिनेमा न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या :

पद्मावत वाद: जिथं भाजप तिथे करणी सेनेचा धुडगूस

कुठे 2400 तर कुठे 1500 रुपये तिकीट, विरोध झुगारुन 'पद्मावत'ला गर्दी

या’ चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित करणार नाही : मल्टिप्लेक्स असोसिएशन

'पद्मावत' सिनेमाच्या पाठिंब्यावरुन मनसेमध्ये फूट