मुंबई : 'पद्मावत' चित्रपटाला करणी सेनेने विरोध केला असला तरी प्रेक्षक थिएटरवर गर्दी करत आहेत. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्यासोबत शाहिद कपूरच्या अभिनयाची तारीफ होत आहे. मात्र राजा रावल रतन सिंह यांच्या भूमिकेसाठी शाहिद पहिली पसंती नव्हता.


राजा रावल रतन सिंह यांच्या भूमिकेसाठी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला विचारणा झाली होती. मात्र शाहरुखसोबत भन्साळींची बोलणी फिस्कटली आणि अखेर ही भूमिका शाहिदच्या पदरात पडली. 'दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम' या उक्तीला साजेसं शाहिद कपूरने भूमिकेचं सोनं केलं.

शाहरुखने भूमिका का नाकारली?

शाहरुखला ऐतिहासिक चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारायची नव्हती. त्यामुळे त्याने भन्साळींना नकार दिला.

शाहरुखने भन्साळींना मानधनाचा आकडा दुप्पट करुन मागितल्याचंही म्हटलं जातं. पूर्वी शाहरुख एका चित्रपटाते 45 ते 50 कोटी रुपये घ्यायचा, मात्र पद्मावतसाठी त्याने 90 कोटींची मागणी केली.

साहजिकच संजय लीला भन्साळी यांनी दुसऱ्या अभिनेत्याचा शोध सुरु केला. विशेष म्हणजे शाहिद कपूरने अवघ्या 9 ते 10 कोटी रुपयांमध्ये तयार झाला.