Will Smith : 'ऑस्कर 2022' पासून अभिनेता विल स्मिथ (Will Smith) चर्चेत आहे. 'किंग रिचर्ड'साठी अकादमी पुरस्कारांमध्ये विलचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून झालेला सन्मान ख्रिस रॉकला (Chris Rock) लगावलेल्या एका थप्पडमुळे झाकोळून गेला. या घटनेला आता अनेक महिने झाले आहेत. अशातच विल स्मिथने ख्रिस रॉकची माफी मागितली आहे. यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विल स्मिथनचा व्हिडीओ व्हायरल
विल स्मिथने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विल स्मिथने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. व्हिडिओमध्ये व्हिल स्मिथ म्हणाला,"मी ख्रिस रॉकची माफी मागायला गेलो होतो. पण त्याला माझ्यासोबत बोलण्याची इच्छा नाही. मला एवढचं सांगायचं आहे की, जे काही झाले त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. मी जे काही केलं ते चुकीचे आहे. त्या दिवशी जे घडलं ते अत्यंत वाईट आहे. त्यामुळे मी अनेकांचे मन दुखावलं आहे".
विल स्मिथ थप्पड प्रकरण काय आहे?
2022 ऑस्कर अकादमी पुरस्कार सोहळ्यादरम्यान, हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने त्याची पत्नी जाडाच्या आजारपणावर विनोद केल्याबद्दल कॉमेडियन ख्रिस रॉकला स्टेजवरच थप्पड मारली. या थप्पडचा आवाज मात्र जगभरात ऐकू आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता
'किंग रिचर्ड्स' सिनेमासाठी विल स्मिथला मिळाला ऑस्कर
विल स्मिथचा 'किंग रिचर्ड्स' हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामावर आधारित आहे. चित्रपटाचे कथानक टेनिसपटू सेरेना, व्हीनस विल्यम्सचे वडील आणि प्रशिक्षक रिचर्ड विल्यम्स यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विल स्मिथनं या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.