AR Rehman Support Will Smith : छोट्या पडद्यावरील द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळाली. या कार्यक्रमाध्ये दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. एका एपिसोडमध्ये टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा हीरोपंती-2 (Heropanti 2) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये उपस्थित होता. टायगरसोबतच ए. आर. रहमान यांनी (A.R. Rehman) देखील या शोमध्ये हजेरी लावली. 


कपिल शर्मा या शोमध्ये एक सेगमेंट असा असतो. ज्यामध्ये सेलिब्रिटींना काही फोटो दाखवले जातात त्या फोटोला नेटकऱ्यांनी केलेल्या विनोदी कमेंट्स देखील कलाकारांना दाखवल्या जातात. या सेगमेंटमध्ये ए. आर. रहमान यांना विल स्मिथसोबतचा त्यांचा फोटो दाखवण्यात येतो. हा फोटो 2018 मध्ये विल स्मिथ आणि ए.आर.रहमान यांनी काढला होता. ऑस्करमधील विल स्मिथच्या थप्पड प्रकरणाबाबत एका नेटकऱ्यानं कमेंट केली होती. त्यावर ए.आर. रहमान हे विल स्मिथला 'स्वीटहार्ट' असं म्हणतात. पुढे ते म्हणतात, 'विल स्मिथ हा चांगला माणूस आहे. कधी कधी काही गोष्टी घडत असतात.'


ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये ख्रिस रॉक स्टेजवर डॉक्यूमेंटरी फीचरसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यासाठी आला होता. यावेळी ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ हिच्याबाबत प्रतिक्रिया दिली. पण ही मस्करी स्मिथला सहन झाली नाही आणि त्याने थेट स्टेजवर जात रॉक यांच्या कानशिलात लगावली होती. 


हीरोपंती-2 हा चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. 2014 मध्ये रिलीज झालेल्या हीरोपंती या चित्रपटाचा हा दुसरा पार्ट असणार आहे. 


संबंधित बातम्या