Arjun Bijlani Join Karan Johar's Production : करण जोहरचा (Karan Johar) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता अर्जुनने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आगामी सिनेमासंदर्भात माहिती दिली आहे. करणने अर्जुनसाठी एक खास नोट पाठवली आहे. 



अर्जुनसाठी पाठवलेल्या नोटमध्ये करणने लिहिलं आहे, धर्मा प्रॉडक्शनमध्ये स्वागत. मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे". अर्जुनने त्याच्या इंस्टाग्रामवर ही नोट शेअर केली आणि लिहिलं आहे, "अखेर मला करण सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मला आनंद आहे की मी या सिनेमाचा एक भाग होऊ शकलो."






10 फेब्रुवारीला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तरुण दिवा सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे या चित्रपटात कॅमिओ भूमिका करताना दिसणार आहेत. हा कौटुंबिक सिनेमा असून 10 फेब्रुवारीला हा सिनेमा  सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची  रिलीज डेट जाहीर झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया भट्ट नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. लवकरच तिचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संबंधित बातम्या


Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर


Movies Release on August : ऑगस्टमध्ये प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 'लाल सिंह चड्ढा'पासून 'दे धक्का 2'पर्यंत बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित