Netflix Subscription : नेटफ्लिक्सने सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी सबस्क्रिप्शनच्या (Subscription) किंमतीमध्ये कपात केली आहे. नेटफ्लिक्सने सर्वात कमी प्लॅनसह आपल्या सबस्क्रिप्शनच्या किंमती कमी केल्या आहेत. नेटफ्लिक्सचा फक्त मोबाईल प्लॅन 199 रुपये प्रति महिना दरात होता, तो आता 149 रुपये प्रति महिना उपलब्ध असेल.
आता वापरकर्ते त्यांच्या मोबाईल आणि टॅबलेटवर 480p व्हिडिओ रिझोल्यूशनसह नेटफ्लिक्सवर पाहू शकतात. याशिवाय बेसिक प्लॅनची किंमत 499 रुपयांवरून 199 रुपये करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये देखील 480p रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ उपलब्ध असतील, परंतु वापरकर्ते त्यांचे आवडते शो आणि चित्रपट त्यांच्या संगणक, मोबाइल आणि टीव्हीवर देखील पाहू शकतील.
स्टँडर्ड प्लॅन ज्यासाठी आधी महिन्याला 649 रुपये आकारले जायचे तो प्लॅन आता महिना 499 रुपयांना उपलब्ध होईल. नेटफ्लिक्सचा सर्वात महागडा प्रीमियम टियर प्लॅन जो अल्ट्रा हाय-डेफिनिशन (Ultra HD) चार समवर्ती स्क्रीनसाठी सपोर्ट करतो, त्याची किंमत आता 799 रुपये प्रति महिनावरून 649 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नेटफ्लिक्सने सबस्क्रिप्शनच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. 14 डिसेंबरपासून नवे दर लागू होणार असून विद्यमान सदस्यांसाठी एक नवीन स्वयं-अपग्रेडचा पर्याय असेल. यामध्ये वापरकर्त्यांचे सध्याचे चालू प्लॅन आपोआप नव्या प्लॅनमध्ये अपग्रेड होतील.
संबंधित बातम्या
Netflix च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, सबस्क्रिप्शन आता फक्त 149 रुपये
John Abraham on Instagram : जॉन अब्राहमने इंस्टाग्राम अकाऊंटवरून हटवल्या सर्व पोस्ट, चाहते गोंधळात
Bigg Boss Marathi 3 : सिद्धार्थ जाधवने घेतली महेश मांजरेकरांची जागा, मांजरेकरांनी सोडला बिग बॉस मराठी कार्यक्रम?
Brahmastra Motion Poster : 'लव्ह... लाइट... फायर...' ब्रह्मास्त्र चित्रपटाचा मोशन पोस्टर उद्या होणार रिलीज; अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha