Parineeti Chopra Raghav Chadha : अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha)  या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे. परिणीती आणि राघव यांनी लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  परिणीती आणि राघव यांच्या लग्न सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तसेच परिणीती आणि राघव  यांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील लग्न सोहळ्याला उपस्थित होते. मात्र परिणीतीची बहिण प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra ) ही लग्न  सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही. प्रियांका ही परिणीती आणि राघव  यांच्या लग्न सोहळ्यात का गैरहजर होती? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर प्रियांकाची आई  मधु चोप्रा यांनी दिलं आहे.


नुकताच मधु चोप्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर्स मधु चोप्रा यांना परिणीती आणि राघव  यांच्या लग्न सोहळ्याबाबत प्रश्न विचारत आहेत, असं दिसत आहे. एका फोटोग्राफरनं मधु चोप्रा यांना प्रश्न विचारला, कसा झाला लग्न सोहळा? या प्रश्नाचं उत्तर " खूप छान!" असं मधु चोप्रा यांनी दिलं. त्यानंतर एका फोटोग्राफरनं  मधु चोप्रा यांना प्रश्न विचारला की, प्रियांका ही परिणीती आणि राघव यांच्या विवाह सोहळ्याला का हजर राहू शकली नाही? याचं मधु चोप्रा यांनी दिलं, "ती काम करत आहे."






परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला प्रियांकानं कमेंट केली, "माझे आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असतील."


परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,"नाश्त्याच्या टेबलावर आमची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीतच चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर आता आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय आयुष्य जगू शकत नव्हतो. आता नव्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली आहे". 


संबंधित बातम्या:


Parineeti Chopra Raghav Chadha : पहिली भेट ते लगीनगाठ; नववधू परिणीतीची लग्नानंतरची पहिली पोस्ट